मुंबई

मुंबईत श्रावणसरी बरसणार; ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जोरदार पावसाची शक्यता...

संजय घारपुरे

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबई तसेच उपनगरात पावसाने ब्रेक घेतला आहे. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सलग तीन दिवस जोरदार पाऊस झाल्यानंतर वरुणराजा केवळ हजेरी लावण्यापुरता येत आहे. मात्र, मुंबईकरांना आता श्रावणसरींचा आनंद लुटता येणार असून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. स्कायमेट या खासगी वेधशाळेने हा अंदाज वर्तवला आहे. 

दरम्यान, येत्या 24 तासांत मुंबई आणि उपनगरात एखाद-दोन हलक्या पावसाच्या सरी बरसतील, अशीही शक्यता वर्तवली आहे. मुंबई वेधशाळेनुसार, सांताक्रुझमध्ये 9 मिलिमीटर आणि कुलाबा येथे 24 मिलिमीटर पाऊस झाला आहे. सध्याच्या वातावरणात आगामी चार दिवसात फारसा बदल अपेक्षित नाही. पावसाचा जोरही वाढणार नाही असे स्कायमेटने सांगितले आहे. 

कर्नाटकच्या किनाऱ्याजवळ अरबी समुद्रात वादळी स्थिती निर्माण होत आहे. यामुळे कोकण आणि गोव्यात पाऊस होत आहे. त्यामुळे मुंबई आणि परिसरात पुढील आठवड्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. स्कायमेट प्रत्येक दिवशी हवामानाबाबत  अंदाज व्यक्त करीत असते. त्यानुसार 31 जुलैपासून मुंबईतील पावसाचा जोर वाढेल. मुंबईत 3 आणि 4 ऑगस्टला जोरदार पाऊस अपेक्षित आहे. ऑगस्टच्या सुरुवातीपासून पावसाचा जोर वाढेल आणि त्यामुळे वातावरण जास्त आल्हाददायक होण्याची शक्यता आहे. मुंबई वेधशाळेने मात्र रविवारी रात्री मुंबई तसेच परिसरात काही ठिकाणी पावसाच्या काही जोरदार सरी अपेक्षित आहेत असे ट्वीट केले आहे.
---
संपादन : ऋषिराज तायडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

U19 World Cup: ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूने वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला! १२ चौकार अन् ५ षटकारांसह झळकावलं विश्वविक्रमी शतक

Pune Crime : पुण्यातील घायवळ टोळीविरोधात साडे सहा हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल

Latest Marathi News Live Update: निवडणुकीच्या निकालाकडे ५७ देशातून लक्ष

Google Enters IPL : मोठी बातमी! 'गुगल'ची आता ‘IPL’मध्ये एन्ट्री होणार; ‘BCCI’ला तब्बल २७००००००००० रुपये मिळणार

Pune Municipal Election : पुणे महापालिका निवडणुकीचा निकाल; ५७ देशांतील नागरिकांचे ऑनलाइन लक्ष

SCROLL FOR NEXT