मुंबई

मुंबई नागपूर प्रस्तावीत बुलेट ट्रेनसाठी सर्वेक्षण सुरु; हायस्पीड रेल्वेसाठी लिडार तंत्रज्ञानाची मदत

तेजस वाघमारे

मुंबई, ता.12 : मुंबई ते नागपूर या प्रस्तावीत हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरसाठी लिडार सर्व्हेक्षणाला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. लिडार तंत्रज्ञान आणि इमेजरी सेंसॉरने सज्ज असलेल्या विमानाने या सर्वेक्षणासाठी पहिले उड्डाण भरले. या सर्वेक्षणाच्या आधारावर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येणार आहे. तीन ते चार महिन्यात हा अहवाल मिळणार आहे. या मार्गावर जवळपास 13 स्टेशन उभारण्याचा प्रस्ताव आहे. 

मुंबई ते नागपूर प्रस्तावित बुलेट ट्रेनचा मार्गाची एकुण लांबी 736 किलोमीटर एवढी आहे. या प्रकल्पाद्वारे नागपूर, खापरी, वर्धा, पुलगाव, कारंजा लाड, मालेगाव, मेहकर, जालना, औरंगाबाद, शिर्डी, नाशिक, इगतपूरी आणि शहापूर  ही शहरे जोडली जाणार आहेत. राष्ट्रीय हायस्पीड रेल कॉर्पोरेशनने लिमिटेडेने या सर्वेक्षणाची माहिती दिली. देशातील सात हायस्पीड रेल कॉरिडोरचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी रेल कॉर्पोरेशनला देण्यात आली आहे. 

लिडार टेक्नालॉजीचा वापर 

लिडार अर्थातच लाईट डिटेक्शन अँड रेंजिग तंत्रज्ञानामुळे जमीनीवरची परिस्थिती अचूक टिपता येते. एरीयल लिडार आणि  इमॅजरी सेंसॉर बसवलेल्या विमानाद्वारे हवाई पाहणी केली जाते. या सेंसॉरच्या माध्यमातून प्रकल्पालगत 150 मिटरपर्यंतक परिसरातील भौगौलिक रचना आणि इतर तपशील मिळतो. छायाचित्रे, व्हिडीओ घेण्याासाठी  100 मेगापिक्सल क्षमतेचे कॅमेरे वापरल्या जातात.

लेझर, जीपीएस डेटा, वास्तावित छायाचित्राच्या संयोजनातून सर्व माहिती गोळा केली जाते. या माहितीच्या आधारे त्री डी टोपोग्राफीकल मॅप तयार होतो. त्यामध्ये प्रकल्पासाठी लागणारी जागा, स्टेशन आणि डेपोचे लोकेशनचे तपशील मिळतो.

with the help of lidar technology inspection of mumbai nagpur high speed train rout done

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

Bank of Baroda Recruitment: पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बड़ौदामध्ये 2500 पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, निवडपद्धत आणि वेतन

Pune Kondhwa Rape Case : पुणे 'कुरियर बॉय' बलात्कार प्रकरण; आरोपीस अटक अन् धक्कादायक माहितीही उघड!

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

SCROLL FOR NEXT