मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार दाखल होताच, त्यांना मिळाला मदतीचा हात... 
मुंबई

मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार दाखल झाली, ...अन् यंत्रणा हलली!

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : कोरोनाचे उगमस्थान असलेल्या चीनच्या नागरिकांसारख्या दिसणाऱ्या पूर्वोत्तर राज्यातील विद्यार्थ्यांवर हल्ले होण्याचे प्रकार वाढीस लागल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईसह ठाण्यात राहणाऱ्या अरूणाचल प्रदेशमधील 10 ते 12 विद्यार्थ्यांमध्ये देखील याबाबतची अनामिक दहशत पसरली आहे. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून त्यांनी स्वत:ला घरात कोंडुन घेतले होते. या विद्यार्थ्यांचे खाण्यापिण्याचे हाल होत असल्याची तक्रार राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडे आली होती. त्यानंतर हा प्रकार समोर आला. याबाबची माहीती मिळताच ठाणे पोलिसांनी तत्काळ याप्रश्‍नी लक्ष घालून, या विदयार्थाना सुरक्षिततेची हमी दिली. याशिवाय उदरनिर्वाहासाठी लागणाऱ्या जीवनावश्‍यक वस्तुंचा शिधाही मोफत पुरवण्याचे काम ठाणे पोलिसांनी बजावले. 

पुर्वोत्तर तसेच, ईशान्येकडील राज्यातील नागरिक चिनी नागरीकांप्रमाणे दिसतात. त्यामुळे या राज्यांतून मुंबई-ठाण्यात शिक्षणासाठी आलेल्या विदयार्थ्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात फटका बसत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांच्यावर हल्ले होण्याच्या अनेक घटना गेल्या काही काळात समोर आल्या होत्या. त्यातच आता मुंबईसह ठाण्यात राहणाऱ्या अरूणाचल प्रदेशमधील काही विद्यार्थ्यांमध्ये याबाबतची अनामिक दहशत पसरली असल्याचे समोर आले आहे. हल्ला होण्याच्या धास्तीने गेल्या अनेक दिवसांपासून ठाण्यातील घोडबंदर भागातील ब्रम्हांड आणि मुंबईतील मुलुंड परिसरात असे 10 ते 12 विद्यार्थ्यांनी (मुले व मुली) स्वतःला घरातच कोंडुन घेतले होते. 

या विद्यार्थ्याच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याची तक्रार महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाचे सहसचिव प्रशांत लोखंडे यांच्याकडे प्राप्त झाली होती. लोखंडे यांनी ही बाब ठाणे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांना कळवली. त्यानुसार, ठाणे पोलिसांनी तत्काळ या विद्यार्थ्यांची भेट घेत त्यांना धीर दिला. तसेच, उपायुक्त पाटील यांनी स्वतः पदरमोड करून जीवनावश्‍यक वस्तुंचे किट बनवुन पोलिसांना करवी या सर्व विद्यार्थाना वाटप केले. या मदतीची उतराई म्हणून विद्यार्थानी ट्‌वीटरच्या माध्यमातुन मुख्यमंत्री कार्यालयासह ठाणे पोलिसांचे देखील आभार मानले आहेत.
 
ही बातमी वाचली का?  आदित्य ठाकरेंच्या मतदार संघामुळे अवघी मुंबई हादरलीये; वाचा नेमकं काय झालंय...


लॉकडाऊनमुळे परराज्यातील विशेषत: ईशान्येकडील राज्यातील विद्यार्थ्यांना स्वतःच्या घरी देखील जाता येत नाहीये. चिनी नागरिकांच्या देहावळीप्रमाणे ते दिसत असल्याने त्यांना कोरोनाचा सर्वाधिक फटका बसत आहे. त्यांच्या मनात हल्ला होण्याची भीती आहे. त्यामुळे मुंबईसह ठाण्यात राहणाऱ्या या सर्व 10 ते 12 विद्यार्थ्यांना भेटून धीर दिला. त्यांना लागणाऱ्या दैनंदिन वस्तुंचा पुरवठा केला. 
- बाळासाहेब पाटील, पोलीस उपायुक्त, ठाणे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT