मुंबई

'सर्वसामान्यांच्या रेल्वे प्रवासाचा विचार करा'; उच्च न्यायालयाची राज्य सरकारला सूचना 

सुनिता महामुनकर


मुंबई : लॉकडाऊननंतर जनजीवन हळूहळू पुर्वपदावर येत आहे. अशावेळी केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच नाही, तर सर्वसामान्यांनाही रेल्वेतून प्रवास करण्याबाबत राज्य सरकारने विचार करणे आवश्यक आहे. रेल्वे आणि बस वाहतुकीचे नियोजन करायला हवे, अशी सूचना आज मुंबई उच्च न्यायालयाने केली.

वकिलांना रेल्वे प्रवास करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका ॲड. उदय वारुंजीकर आणि ॲड. डॉ मिलिंद साठे यांच्यातर्फे न्यायालयात करण्यात आली आहे. याचिकेवर आज मुख्य न्या. दिपांकर दत्ता आणि न्या गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. 

केवळ वकिलच नाही तर सर्वाचा विचार व्हायला हवा. लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार गेला, व्यवसाय थांबला. पण आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. सरकारी आणि खासगी नोकरवर्ग कामाला जात आहे. त्यामुळे त्यांच्या प्रवासाबद्दल सरकारने विचार करायला हवा, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. 
मुंबई सारख्या ठिकाणी रस्ते वाहतूक हा प्रवासाचा पर्याय प्रत्येकला शक्य नाही. त्यामध्ये अनेक तास प्रवासात निघून जातात. त्यामुळे मुंबई लोकल सुरू करणे हाच पर्याय आहे, असेही खंडपीठाने स्पष्ट केले. 
कनिष्ठ न्यायालयाचे काम दुपारच्या सत्रात (2 ते 6) केले तर गर्दी  कमी होऊ शकते, असे ही खडपीठ म्हणाले. बार कॉन्सिलने याबाबत सर्वांना सोयिस्कर होतील, अशा सूचना सुचवाव्या आणि सरकारने त्यावर विचार करून बाजू मांडावी, असे न्यायालयाने निर्देश दिले. 

‘नागरिकांच्या गरजाही महत्त्वाच्या’
रेल्वे गर्दीमुळे कोरोना धोका वाढत आहे असे सरकारी वकील पूर्णिमा कंथारिया म्हणाल्या. मात्र लॉकडाऊनमुळे लोकांना उदरनिर्वाह बंद झाला. रेल्वेमुळे गर्दी होते हे खरे पण नागरिकांच्या गरजाही महत्त्वाच्या आहेत. काम बंद झाल्यामुळे कोणी ट्रक चालक झाले, तर कोणी भाजी विकतात, अशा बातम्या वाचायला मिळतात, असे खंडपीठ म्हणाले. याचिकेवर पुढील सुनावणी 5 ऑक्टोबरला होणार आहे.

वकिलांना दिलासा 
बार कौन्सिलच्या वतीने करण्यात आलेल्या याचिकेत वकिलांना रेल्वेतून प्रवास करण्याची मुभा मागण्यात आली आहे. त्यासाठी नोंदणी करून प्रवासाची मुभा देण्याचे   सुचविण्यात आले आहे. राज्य सरकारने अद्याप सर्व सामान्य नागरिकांना रेल्वे परवानगी दिलेली नाही. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ही परवानगी देण्यात आली आहे.

--------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

SCROLL FOR NEXT