मुंबई

जनगणनेच्या प्रश्नावलीमध्ये जातीसंबंधित रकान्याचा समावेश करण्याची मागणी हायकोर्टाकडून नामंजूर

- सुनीता महामुणकर

मुंबई, ता. 5 : केंद्र सरकारकडून केल्या जाणाऱ्या जनगणनेच्या प्रश्नावलीमध्ये जातीसंबंधित रकान्याचा समावेश करण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयाने नामंजूर केली आहे. कोणतेही न्यायालय जनगणनेच्या प्रश्नावलीमध्ये हस्तक्षेप करू शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. 

राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चा या संस्थेच्या वतीने नागपूर न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. तसेच दोन वकिलांनीही याच प्रकारची मागणी करणारी याचिका केली होती. सध्या उपलब्ध असलेली प्रश्नावली रद्दबातल ठरवावी आणि नवीन प्रश्नावलीमध्ये जातीसंबंधित अतिरिक्त रकान्याचा समावेश जनगणना संचालनालयाने करावा, अशी मागणी याचिकेत केली होती. याचिकेवर न्या. सुनील शुक्रे आणि न्या अविनाश घारोटे यांच्या खंडपीठापुढे नुकतीच सुनावणी झाली. 

सध्या काही जातींचा मागासवर्गीय गटात समावेश झाला आहे. त्यामुळे जनगणनेदरम्यान त्याची माहिती उपलब्ध करावी, असा युक्तिवाद याचिकादारांकडून करण्यात आला. मात्र केन्द्रीय ग्रुह मंत्रालयाने या मागणीला विरोध केला. याचिकादाराची मागणी मान्य केली तर ते न्यायालयाचे धोरण ठरु शकते. जनगणना आणि त्याच्या नियोजनाची पध्दती ही केंद्र सरकारच्या धोरणात्मक निर्णयाचा भाग आहे. सरकारच्या धोरणात्मक निर्णयांमध्ये न्यायालय हस्तक्षेप करु शकत नाही असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे, असा दावा सरकारकडून करण्यात आला. न्यायालयाने हा दावा मान्य केला. 

कोणतेही न्यायालय जनगणना प्रश्नावलीच्या धोरणात्मक निर्णयामध्ये हस्तक्षेप करु शकत नाही आणि नवीन रकानाही सुचवू शकत नाही, असे स्पष्ट करीत खंडपीठाने याचिका नामंजूर केली.

( संपादन - सुमित बागुल )

High Court rejects demand for inclusion of caste related column in census questionnaire

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं उच्चांकापासून 26 हजारांनी स्वस्त! पाहा ताजा भाव; पुढे सणासुदीच्या काळात सोनं महागणार की स्वस्त होणार?

पत्नीच्या खून प्रकरणी पती-सासऱ्यासह ८ जण तुरुंगात गेले, १२ वर्षांनी जिवंत सापडली महिला

MPSC Exam Success Story : शेतकरी बापाची लेक अन् आई पोलिसात! जाधववाडीच्या निकिताची MPSC मध्ये गगनभरारी, महसूल सहाय्यकपदी निवड

Marathi News Live Updates : कोकणवासियांचा खोळंबा! मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा, प्रचंड वाहतूक कोंडी

Caste Validity Certificate : जातवैधता प्रमाणपत्राचा आग्रह न धरता तात्पुरता प्रवेश द्या; उच्च न्यायालयाकडून अंतरिम दिलासा

SCROLL FOR NEXT