संकट काळात ग्राहकांची लुटमार 
मुंबई

मुंबईत संकटकाळात ग्राहकांची लूटमार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : दादर मार्केटचे विभाजन केल्यानंतर नव्याने तयार केलेल्या मार्केटमध्ये विक्रेत्यांची गर्दी कमी होईल, असे प्रशासनाला वाटले होते. मात्र, गर्दी कमी होण्याऐवजी वाढत आहे. कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती हीच पैसा कमविण्याची नामी संधी असल्याने याचा फायदा उठविला जात आहे. विक्रेत्यांनी नवे विक्रेते तयार केल्याने गर्दी वाढत असल्याचे दिसत आहे. चढ्या भावाने जीवनावश्यक वस्तू विकून ग्राहकांची लूट होत आहे. 


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी कमी करण्यासाठी दादर पश्चिम येथील भाज्यांच्या घाऊक बाजाराचे २९ मार्चपासून विभाजन करण्याचा निर्णय पालिकेने घेतला. त्यामुळे दादरमधील भाजीपाला बाजार बंद होऊन घाटकोपर सोमय्या मैदान, दहिसर, मुलुंड, वांद्रे बीकेसी या ठिकाणी बाजार सुरू झाला आहे. दादर येथील सेनापती बापट मार्गावरील घाऊक भाजीपाला मार्केटमध्ये दररोज राज्याच्या विविध जिल्ह्यांमधून घाऊक विक्रीसाठी भाज्या आणि जीवनावश्यक वस्तू येथे येत होत्या. दादरमध्ये भाजीचे २०० ट्रक येत होते. छोट्या, मोठ्या वाहनांमधून १ हजार भाजी विक्रेते या ठिकाणी येत होते. या गर्दीवर नियंत्रण करणे अवघड झाल्याने या मार्केटचे विभाजन केले आहे. ही उपाययोजना करूनही गर्दी कमी करण्यात महापालिका आणि पोलिसांना यश येत नाही. मार्केटच्या विभाजनाने या मार्केटमध्ये होणारी गर्दीही कमी होईल, असे पालिका प्रशासनाला वाटले होते. मात्र, झाले उलटे. स्थलांतरित केलेल्या ठिकाणी गर्दी कमी होत नसून ती वाढत आहे, ही चिंतेची बाब ठरली आहे. 

पैशासाठी अट्टहास
मुंबई महापालिकेची ५५ भाजीपाला मार्केट आहेत. येथे ४ हजारांहून अधिक दुकानदार आहेत. सध्याची सर्वच मार्केटमध्ये होणारी गर्दी पाहता, नव्या बाजारांमध्ये मालाच्या खरेदीसाठी जुन्या विक्रेत्यांसह आता नवे विक्रेतेही गर्दी करू लागल्याचे दिसत आहे. नव्या मार्केटमध्ये होणारी गर्दी ही या विक्रेत्यांची आहे. त्यात घरगुती वापरासाठी मालाची खरेदी करणारे ग्राहक कमी आहेत. कोरोनाचे संकट असताना ग्राहकांना चढ्या भावाने मालाची विक्री करून केवळ पैसा कमविण्यासाठी विक्रेत्यांचा आटापिटा सुरू असल्याचे दिसत आहे. नव्या मार्केटमधील गर्दीबाबत पालिका मार्केट विभागाचे प्रशांत गायकवाड यांनीही चिंता व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हर हर महादेव! 'राजा शिवाजी'चा टीझर प्रदर्शित, जिनिलिया साकारतेय 'ही' महत्वाची भूमिका, रितेशला पाहून सगळेच झाले थक्क

Sound System Ban : देव-देवतांच्या मिरवणुकीत आता 'या' गोष्टींना नो एन्ट्री; सरकारने काय दिले संकेत? संस्कृती जपण्यासाठी उचलणार कठोर पाऊल!

Latest Marathi News Live Update : धाराशिव जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस

CIDCO: आनंदाची बातमी! सिडकोने गृहकर्ज मर्यादा वाढवली; आता घर खरेदीचे स्वप्न पूर्ण होणार, व्याजदर अन् नवीन लिमिट किती?

Gudi Padwa 2026: भोपाळमध्ये 'मराठी' थाट! मुख्यमंत्र्यांनी घातली पेशवाई पगडी; ढोल-ताशांच्या गजरात गुढी उभारून केले नववर्षाचे स्वागत

SCROLL FOR NEXT