मुंबई

'या' गावात कोरोनाविरोधात हिंदू-मुस्लिम ऐक्य; घेतला हिताचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : अंधेरी पश्चिमेतील वर्सोवा विभागात कोरोनाचे रुग्ण आढळल्याने कोरोनाचा गावात शिरकाव होऊ द्यायचा नाही, अशा निर्धाराने वसावे गावात हिंदू मुस्लिम एकत्रित झाले आहे. या ऐक्यातून गावबंदी करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे.

मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. त्यामुळे महापालिकेने मुंबईतील अनेक भाग बंद केले आहेत. अंधेरी पश्चिमेतील वर्सोवा विभागातही कोरोनाचे रुग्ण सापडल्याने या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन वेसावा कोळी जमात ट्रस्टच्या पुढाकाराने वेसावे गावातील सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन वेसावे गावात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. 

वरळी कोळीवाड्यात कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोळीवाड्यामध्ये कोरोनाचा पसरू लागल्याने मुंबईतील सर्वच कोळीवाडे हबकले आहेत. कोरोनामुळे राज्यात अनेक ठिकाणी गावबंदीचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील अंधेरी वर्सोवा भागात असलेला वसावे गावानेही कोरोनाला रोखण्यासाठी एकमताने गावकऱ्यांनी गावबंदीचा निर्णय घेतला आहे. या गावातील हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी एकत्र येत वेसावा कोळी जमात ट्रस्ट, कोकणी सुन्नी जमात ट्रस्ट, यंग मुस्लिम कमिटी आणि अशा विविध संस्थांच्या पुढाकाराने गावबंदीचा निर्णय घेतला आहे. पोलिसांनी लॉकडाऊन करण्याऐवजी नागरिकांनी उत्स्फूर्त गावबंदी केली आहे. 

विलगीकरण कक्षाची मागणी
खबरदारीचा उपाय म्हणून वेसावा येथील स्वातंत्र्यसैनिक पोशा नाखवा उद्यान शाळा संकुल आणि महापालिकेच्या मराठी शाळेत विलगीकरण कक्ष स्थापन करण्याची मागणी वेसावकरांनी केली आहे.

गावबंदीचा निर्णय गावकऱ्यांनी एकमताने घेतला आहे. बाहेरून येणाऱ्याला आम्ही प्रवेश नाकारला आहे. हा निर्णय गावाच्या हिताचा आहे. 
- राजहंस टपके, सरचिटणीस, कोळी महासंघ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमेरिकेत महागाईचा भडका! भारतीयांवर मोठी जबाबदारी; रघुराम राजन यांच्यासह या ३ व्यक्ती फेडच्या टास्क फोर्समध्ये

IND vs ENG: दुसऱ्या वनडेपूर्वी भारताला मोठा धक्का! गुरनूर ब्रारवर ICC ची कारवाई; वाचा नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : वेस्टर्न एक्सप्रेस-वेवर अपघात, पाच कार अन् एक बस एकमेकांना धडकली...

Mumbai Local Violence: मुंबई लोकलमध्ये १२ तासांत चार हिंसक घटना; प्रवासी सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह

ममतांना आणखी एक धक्का, ३ महिन्यापूर्वी राज्यसभेवर पाठवलेल्या खासदार कोयल यांचा राजीनामा

SCROLL FOR NEXT