buildings in mumbai
buildings in mumbai sakal media
मुंबई

दहा वर्षांचा विक्रम मोडला, जुलै महिन्यात घर खरेदीची सर्वाधिक नोंद !

तेजस वाघमारे

मुंबई : कोरोनाचा परिणाम (corona impact) विविध व्यवसायांवर झाला असताना मात्र घर खरेदीला (home purchasing) सुगीचे दिवस आले आहेत. जुलै महिन्याने (July month) गेल्या दहा वर्षाचा विक्रम (10 years record) मोडीत काढला आहे. 2012 पासून आतापर्यंतच्या सर्व जुलै महिन्यांपैकी यंदाच्या जुलै महिन्यात सुमारे 7 हजार 856 घरांची विक्री (home sailing) झाली आहे. ( home purchasing in July made a record of last ten years purchasing-nss91)

मुंबईत कोरोना आटोक्यात आणण्यासाठी लागू केलेले निर्बंध काही प्रमाणात शिथील केले आहेत. याचा परिणाम विविध व्यवसायांवर झाला आहे. गृहनिर्माण क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात सवलत लागू केली होती. या कालावधीतही मोठ्या प्रमाणात घर खरेदी झाली. सरकारने दिलेली सवलत संपुष्ठात आली तरीही मुंबईतील गृहनिर्माण क्षेत्रातील उलाढाल वाढत चालली आहे. नवीन गृहप्रकल्पांप्रमाणेच घरांची खरेदी-विक्रीचे प्रमाणही वाढत चालले असल्याचे मुद्रांक व नोंदणी शुल्क विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आलेल्या माहितीवरून दिसत आहे.

जुलै 2021 च्या 29 जुलै पर्यंत 8 हजार 939 घरांची खरेदी नोंदणी झाली. तर जुलै 2020 मध्ये 2 हजार 662, जुलै 2019 मध्ये 5 हजार 748, जुलै 2018 मध्ये 6 हजार 437, जुलै 2017 मध्ये 6 हजार 95, जुलै 2016 मध्ये 5 हजार 725, जुलै 2015 मध्ये 5 हजार 832, जुलै 2014 मध्ये 5 हजार 253, जुलै 2013 मध्ये 5 हजार 139, जुलै २०१२ मध्ये 7 हजार 367 घरांची नोंद झाली आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये अनेक व्यवसायांवर संक्रांत आली. मात्र बांधकाम क्षेत्रामध्ये विक्रमी वाढ होत असल्याचे दिसत आहे. घरांची मागणी अधिक असल्याने घर खरेदी नोंदणीत वाढ होत राहणार असल्याचे दिसत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Molestation case : राजभवनातल्या तीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल; महिलेच्या आरोपानंतर पोलिसांची मोठी कारवाई

Fact Check: दागिने चोरल्यामुळे पंतप्रधान मोदींना घरातून हाकलण्यात आल्याचा दावा खोटा; वृत्तपत्राचे व्हायरल फोटो खोटे

Paaru : पारू-आदित्यचं लग्न होणार पण...नव्या प्रोमोने प्रेक्षक नाराज

Dindori Lok Sabha Constituency : गुरुजींसमोर ताईंना राजकीय खिचडी शिजवण्याचे आव्हान; दिंडोरी कांटे की टक्कर

Bibhav Kumar Detained: स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या मारहाणीप्रकरणी केजरीवालांच्या पीएला पोलिसांनी घेतले ताब्यात

SCROLL FOR NEXT