मुंबई

धक्कादायक ! पैसे परत केले नाही म्हणून एअर इंडीयाच्या अभियांत्यावर ओढवली 'ही' वेळ

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : उसने घेतलेले पैसे परत न दिल्यामुळे एअर इंडियातील एका अभियंत्याचे गुजरातला अपहरण करून हत्या केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्रिकुटाला अटक केली असून, अधिक तपास सुरू आहे. 

एअर इंडियात अभियंता असलेले दीपक अमृतलाल पांचाळ (59) यांच्या हत्येप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट क्र. 10 च्या पथकाने जयंतीभाई बाबुलालभाई पटेल (64), गोपाळ ऊर्फ करण लिलाभाई परमार (27) आणि राजूभाई आगठ (35) यांना अटक केली. 19 सप्टेंबरला सकाळी घरातून बाहेर पडलेले पांचाळ परत आले नाहीत. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर अंधेरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला. गुन्हे शाखेच्या युनिट क्र. 10 ने समांतर तपास हाती घेतला; परंतु पांचाळ यांचा ठावठिकाणा लागत नव्हता. 

गोधडीत गुंडाळलेला मृतदेह सिमेंटच्या खांबाला बांधून ठेवला

दरम्यान, गुजरात येथील ब्राम्हणी डॅम-2, तालुका हलवद, जिल्हा मोरबी येथे सिमेंटच्या खांबाला बांधून गोधडीत गुंडाळलेला मृतदेह सापडला होता. हा मृतदेह बेपत्ता असलेले पांचाळ यांचा असल्याचे उघड झाले. या प्रकरणाचा तपास करत असलेल्या गुन्हे शाखेच्या युनिट क्र. 10 ने या गुन्ह्याची माहिती असलेल्या एका व्यक्तीला शोधून काढले. त्याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी दिल्ली, अहमदाबाद, राजकोट, मोरबी, जुनागड या ठिकाणी शोध घेऊन तीन संशयित आरोपींना पकडले. पैशांच्या वादातून पांचाळ यांचे अपहरण करून हत्या केल्याची कबुली त्यांनी दिली. 

गुन्हे शाखेची कामगिरी : 

आरोपींनी दीपक पांचाळ यांचे मुंबईतून अपहरण करून त्यांना गुजरातमध्ये नेले. तेथे त्यांची हत्या केली व गुन्हा लपवण्यासाठी ब्राम्हणी डॅम-2 येथे मृतदेहाची विल्हेवाट लावली. गुन्हे शाखेच्या युनिट क्र. 10 चे प्रभारी पोलिस निरीक्षक सुनील माने, सहायक निरीक्षक धनराज चौधरी, मोहन घाणेकर, राजेश मोरे, अविनाश चिकणे, अजित पाटील यांच्या पथकाने अथक परिश्रम घेऊन हा गुन्हा उघडकीस आणला. 

WebTitle : horrible air india engineer kidnapped for not repaying his debt 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: उद्धव ठाकरेंचा दिल्लीतून सत्ताबदलाचा नारा! 'सीजेपी'च्या आंदोलनाला दिली भेट, दीपकेंचं केलं कौतुक

Supreme Court: 'अपार आयडी'ला सुप्रीम कोर्टाचा रेड सिग्नल! 26 कोटी विद्यार्थ्यांचा प्रश्न; कोर्टाचा मोठा निर्णय

Rahul Gandhi Protest: राहुल गांधींची तीन तासांनंतर सुटका; बाहेर आल्यानंतर प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया...

Marathi Culture: डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या साहित्यिक वारशाचा गौरव; ‘संस्कृती-संशोधन केंद्रा’त चार पुस्तकांचे प्रकाशन

Ambad Highway Chaos: अंबडमध्ये महामार्गावर मोकाट जनावरांचा धुमाकूळ; वाहतुकीला अडथळा, नागरिकांचा जीव मुठीत

SCROLL FOR NEXT