मुंबई

धक्कादायक ! देशात प्रत्येक 1456 रुग्णांसाठी फक्त एक डॉक्टर..

सकाळ वृत्तसेवा

मोठं हॉस्पिटल असो किंवा लहानसा दवाखाना, प्रत्येक ठिकाणी रुग्णांची रांग लागल्याचं आपण कायमच पाहतो. याचं सर्वात मोठं कारण आहे, डॉक्टर आणि रुग्णांच्या संख्येतील तफावत. डॉक्टरांच्या तुलनेत रुग्णांची संख्या खूप जास्त आहे. मुंबईसह देशभरात हीच परिस्थिती आहे. ज्यामुळे रुग्णांना केवळ उपचार मिळण्यास उशीर होत नाही तर अनेक कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतोय.

नुकताच संसदेत याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यामध्ये डॉक्टर आणि रुग्णांच्या संख्येची सरासरी विचारण्यात आली. यावर मिळालेल्या उत्तरातून देशात दर 1456 लोकांच्या मागे फक्त एक डॉक्टर आहे.   

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO च्या एका अहवालानुसार, प्रत्येक एक हजार नागरिकांच्या मागे एक डॉक्टर असायला हवा. मात्र, देशातील प्रत्येक राज्यात हीच परिस्थिती आहे. भारतातील 135 करोड नागरिकांसाठी भारतात केवळ 9.27 डॉक्टर्स काम करतायत.     

BMC मध्ये पन्नास टक्के पदं रिक्त :  

BMC च्या सर्व हॉस्पिटल्समध्ये निवासी डॉक्टरांवर रुग्णसेवेची जबाबदारी असते. यामागील सर्वात मोठं कारण म्हणजे बीएमसी रुग्णालयांमधील डॉक्टरांचा अभाव. याबाबत बोलताना BMC च्या अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी BMC रुग्णालयांमध्ये डॉक्टरांच्या पन्नास टक्के जागा रिक्त असल्याचं सांगितलं आहे. या रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सुरु आहे.   

सरकारच्या उदासीनतेचचं हे आहे कारण : 

इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी या प्रकाराला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असल्याचं म्हटलंय. भारतात आरोग्यावर देशाच्या एकूण बजेटपैकी  2 टक्के देखील खर्च होत नाही. सध्याच्या परिस्थितीत आरोग्यावर साधारण साडे तीन टक्के खर्च होणं अपेक्षित आहे. कमी बजेटमुळे देशात मेडिकल कॉलेज किंवा आरोग्याशी संबंधित पायाभूत सुविधा निर्माण होण्यास अडचण येतेय. म्हणूनच देशातील डॉक्टरांची संख्या वाढत नाहीये. वारंवार याबद्दल सरकारसोबत बैठका देखील झाल्यात, मात्र त्यातून कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. सरकारच्या म्हणण्यानुसार 'नॅशनल मेडिकल कमिशन'च्या माध्यमातून देशातील डॉक्टर्सची संख्या वाढणार असल्याचं सांगितलं जातंय. मात्र या माध्यमातून बोगस डॉक्टर्सच्या संख्येत वाढ होणार असल्याचं बोललं जातंय.        

अनेकदा डॉक्टर्स आणि रुग्णांच्या संख्येतील तफावतीमुळे डॉक्टरांना प्रत्येक रुग्णाला पाहिजे तेवढा वेळ देता येत नाही. अशातच काम करणाऱ्या डॉक्टरांवर अतिरिक्त भार येतोय.  

Webtitle : horrible for every 1456 patients there is only one doctor thats why you have to wait in long que 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: ‘राष्ट्रवादी’च्या राज्य नेतृत्वामध्ये बदलाची शिफारस; प्रशांत किशोर यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी रणनीतीबाबत चर्चा

Maharashtra Teacher Recruitment : राज्यात 30 हजार, तर कोल्हापुरात 606 शिक्षकांची महाभरती; 'पवित्र पोर्टल'वर पसंतीक्रम नोंदणीला सुरुवात, झेडपी शाळांमध्ये सर्वाधिक 13,351 जागा

IND vs SL: टीम इंडिया ९ वर्षांनी श्रीलंकेत खेळणार कसोटी! कोणाच्या नावावर सर्वाधिक विकेट्स अन् धावा?

Marathi News Live Updates : राष्ट्रवादीसाठी आगामी रणनीती ठरवण्याच्या कामाला प्रशांत किशोर यांच्याकडून सुरुवात

Nagpur Ganeshotsav 2026: गणेशोत्सव मंडळांच्या परवानगीसाठी ‘सिंगल विंडो’ ; महापौर नीता ठाकरे;ऑनलाइन मिळणार सर्व ना हरकत प्रमाणपत्रे

SCROLL FOR NEXT