मुंबई

चिमुकल्याला दिले गरम चमच्याचे चटके! जेवताना लघुशंका केल्याने निर्दयी बापाचे कृत्य

शर्मिला वाळुंज

ठाणे - जेवत असतानाच सहा वर्षीय मुलाने लघूशंका केली म्हणून जन्मदात्या बापानेच गरम चमच्याचे चटके देत मुलाला अमानूष मारहाण केल्याची घटना कल्याण पूर्वेत घडली आहे. कोळसेवाडी पोलिसांनी याप्रकरणी आरोपी बापाला ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु केली आहे. नातेवाईकांमुळे हा प्रकार उघडकीस आला असून या घटनेमुळे परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. 

कल्याण पूर्वेतील विजयनगर परिसरात राहणाऱ्या एका सहा वर्षीय मुलाच्या पायाच्या मांडीवर व पार्श्वभागावर मोठ्या जखमा झाल्या असल्याचे मुलाच्या नातेवाईकांनी पाहीले. त्यांना याविषयी मुलाकडे विचारणा केली असता मुलाने सांगितले की, पप्पांनी मारले आहे. मुलासोबत असे का केले हे विचारणा करण्यासाठी यांच्या घरी गेलेल्या महिलेला सुद्धा मुलाच्या वडीलांनी याने दमदाटी करीत तेथून हकलवून लावले. ही महिला मुलाला घेऊन पोलीस ठाण्यात आली. मुलाच्या अंगावरील चटके पाहून पोलिसही हवालदील झाले. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक शाहूराज साळवे यांनी सांगितले, सचिन कांबळे याला याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे.

मुलाने जेवण करताना लघूशंका केली याचा राग आल्याने त्याने घरातील चमचा गरम केला आणि मुलाला चटके देत जखमी केले असून मारहाणही केली आहे. मुलाला मेडीकलसाठी पाठविण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु आहे. संबधीत वडिलाची तीन लग्ने झालेली आहेत. पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर दुसऱ्या पत्नीचाही मृत्यु झाला. दुसऱ्या पत्नीकडून हर्ष हा मुलगा आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जन्मदाताच एवढा निर्दयी कसा होऊ शकतो असाच प्रश्न पोलिसांसह सर्वांनाच पडला आहे.

Hot clicks given to little boy The act of father in kalyan east 

-----------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT