मुंबई

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे धक्कादायक विधान, अडचणीत येण्याची शक्यता

हेमलता वाडकर

मुंबई: अल्लाहला माहित होते कोरोना येणार आहे. म्हणून मुंब्य्रात कब्रस्थान झाले असल्याचे धक्कादायक विधान राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेविकेच्या कार्यालयाच्या उदघाटन सोहळयात त्यांनी केलेले हे विधान सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या वक्तव्यामुळे भविष्यात आव्हाड अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कळवा-मुंब्रा विधानसभा मतदार संघाचे आमदार आणि गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या विधानाने वादंग निर्माण झाला आहे.  2011 मध्येच अल्लाहला माहित होते कोरोना कधी येणार आणि त्यानंतर 2020 मध्ये कोरोना महामारी आली. म्हणूनच  2019 मध्ये आपल्याला कब्रस्थान मिळाले असल्याचे आव्हाड बोलत असल्याची क्लिप व्हायरल झाली आहे.

मुंब्रावासियांची कब्रस्थानची मागणी ही अनेक वर्षांनंतर पूर्ण झाल्याचे अपयश झाकण्यासाठी मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी अल्लाहचा सहारा घेतल्याची चर्चा सुरु झाली आहे. तर दुसरीकडे मुस्लिम समाजाला खूश करण्याच्या नादात केलेले हे विधान अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे असल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या आहेत.

-------------------

(संपादन- पूजा विचारे)

Housing Minister Jitendra Awhad shocking statement in mumbra thane

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT