वीजच नाही तर ऑनलाईन शिक्षण कसे? रायगडमधील शाळांना अडसर 
मुंबई

वीजच नाही तर ऑनलाईन शिक्षण देणार कसे? शिक्षकांचा सवाल

सकाळ वृत्तसेवा

माणगाव : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सर्व शाळांना सरकारने सुटी जाहीर केली आहे. या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय सरकारने समोर ठेवला आहे; मात्र चक्रीवादळात खंडित झालेला वीजपुरवठा आणि अँड्रॉईड फोनच्या अनुपलब्धतेमुळे आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून दूरच आहेत. 

सरकारच्या धोरणानुसार सर्वच शाळांतील विद्यार्थी घरी आहेत. घरी राहिल्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ नये, यासाठी ऑनलाईन शिक्षण पद्धतीने त्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. अनेक शाळा, संस्था व शिक्षक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत विद्यार्थ्यांना घरच्या घरी अभ्यास करण्यासाठी प्रवृत्त करत आहेत. त्यासाठी पालकांच्या व्हॉट्‌सऍप, फेसबुक व मोबाईल संदेशांचा उपयोग केला जात आहे. शंका, चुका दुरुस्तीसाठी प्रत्यक्ष संपर्क करून व्हिडीओ कॉलद्वारे बोलतात; मात्र 3 जूनच्या निसर्ग वादळामुळे जिल्ह्यात खंडित झालेला वीजपुरवठा अद्याप काही गावांत सुरू न झाल्याने काही विद्यार्थी मोबाईल असूनही ऑनलाईन शिक्षणापासून दूर आहेत. जुलैमध्ये नववी, दहावी व बारावीचे वर्ग, ऑगस्टमध्ये सहावी ते आठवीचे वर्ग आणि सप्टेंबरनंतर उर्वरित इयत्ता सुरू होणार आहेत; मात्र ऑनलाईन शाळेचा पर्याय समोर असला तरी अनेक विद्यार्थ्यांना या पद्धतीने शिक्षण घेण्यासाठी अडचणी येत आहेत. 

अनेक शाळांत 30 ते 40 टक्के आदिवासी विद्यार्थी आहेत. त्यांच्याकडे महागडे मोबाईल कोठून येणार? अनेक वाड्यांवर तर विजेचा अभाव आहे. तेथील विद्यार्थी ऑनलाईन शाळेपासून दूरच राहतील. यात त्यांचे शैक्षणिक नुकसान होईल. 
- भिवा पवार, जिल्हाध्यक्ष, एकलव्य सामाजिक संघटना, रायगड.

ग्रामीण भागात पालकांकडे अँड्रॉईड मोबाईल असणे शक्‍य नाही. वर्गात शेकडा 10 ते 20 टक्के पालकांकडे मोबाईल असून, तेही कामानिमित्त बाहेर गेल्यास विद्यार्थ्यांना मोबाईल मिळत नाहीत. व्हॉट्‌सऍपद्वारे अभ्यास देण्याचा प्रयत्न करत असतो; मात्र अपेक्षित यश मिळत नाही. 
- लक्ष्मण वालुगडे, शिक्षक, जिल्हाध्यक्ष, शिक्षक परिषद, रायगड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harish Rana Case: हरिश राणाच्या इच्छामरणासाठी १३ वर्षे का लागली? कायदा, कोर्ट आणि वेदनेची पूर्ण कहाणी; ही पहिलीच केस नाही तर…

UPSC Fake Rank Case : युपीएससी उत्तीर्ण तरुणाचा आमदार अन् पोलिसांनी केला सत्कार; सत्य समजताच सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली

Indian Women Hockey: पात्रता मिळवली, आता लक्ष्य विजेतेपदाचे; भारतीय महिला हॉकी संघाचा आज इटलीविरुद्ध उपांत्य सामना

Viral Video: व्हायरल होण्यासाठी वादग्रस्त कृत्य! चेंबूरमध्ये आगरी-कोळी परंपरेचा अपमान, व्हिडिओनंतर उसळला संताप

'मी तिला किस करणार नाही' संजय दत्तने 'या' अभिनेत्रीसोबत किसिंग सीन करण्यास दिलेला नकार, म्हणालेला...'तिला मी...'

SCROLL FOR NEXT