one fraud identity man as a teshil officer cheat to win in women attract with marriage in ratnagiri 
मुंबई

अंधेरी: इन्स्टाग्राम फ्रेंडने विश्वास जिंकून फसवलं महिलेला

अंधेरी पोलीस ठाण्यात या प्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला आहे. एका व्यक्तीने मला इन्स्टाग्रामवरुन फॉलोची रिक्वेस्ट पाठवली होती.

दीनानाथ परब

मुंबई: एका सायबर गुन्हेगाराने (cyber fraudster) युकेचा (UK) नागरिक असल्याचे भासवून अंधेरीत राहणाऱ्या ३४ वर्षीय महिलेसोबत मैत्री (friendship with women) केली. तिचा विश्वास संपादन केला. नंतर तिची फसवणूक (Cheat) केली. अंधेरी पोलीस ठाण्यात या प्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला आहे. एका व्यक्तीने मला इन्स्टाग्रामवरुन फॉलोची रिक्वेस्ट पाठवली होती. तो लंडनमध्ये राहत असल्याचा त्याने दावा केला होता.

मैत्री झाल्यानंतर तिने त्याला आपला फोन नंबर दिला व त्याच्यासोबत चॅटिंग सुरु केले. २७ जुलैला त्या घोटाळेबाजाने महिलेला इंटरनॅशनल नंबरवरुन फोन करुन कार्गो शिपिंगने काही भेटवस्तू पाठवत असल्याचे सांगितले. तिला भेटवस्तुंचे फोटो देखील पाठवले. डिलिव्हरी ट्रॅक करण्यासाठी तिला लिंकही पाठवली.

२९ जुलैला महिलेला एका फोन आला. फोन करणाऱ्याने तो कस्टममधुन बोलत असल्याचे सांगितले. तुम्हाला गिफ्ट आले असून त्यात भरपूर रोकड असल्याचे त्याने सांगितले. तुम्हाला ते गिफ्ट पार्सल मिळवण्यासाठी एक प्रमाणपत्र घ्यावे लागेल, त्यासाठी काही रक्कम भरावी लागेल असे सांगितले. तक्रारदार महिलेने गिफ्ट मिळवण्यासाठी ४.२९ लाख रुपये भरले.

दुसऱ्या दिवशी त्या महिलेला आणखी एक फोन कॉल आला. समोरच्या व्यक्तीने इन्कम टॅक्स अधिकारी बोलत असल्याचे सांगून गिफ्टवर करापोटी ५.६९ लाख रुपये भरायला सांगितले. महिलेने पैसे भरण्यास नकार दिला व स्वत:ची ओळख सिद्ध करायला सांगितले. घोटाळेबाजाने तो फोन कॉल कट केला. त्यावेळी महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT