मुंबई

कोरोना पसरण्याबाबत आणखीन एक 'मोठा' खुलासा, कोरोना 'असा' जास्त पसरतो...

सकाळवृत्तसेवा

मुंबई - कोरोना संसर्गाच्या बहुतेक केसेस या अधिक जवळ आल्याने तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्याने समोर आल्या आहेत. त्यामूळे, जास्त जवळ येऊ नका, कोरोनाचा संसर्ग अधिक फैलावतो असे आयसीएमआरने स्पष्ट केले आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी, शारीरिक अंतर आणि स्वच्छता यासारख्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे,असे इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) सांगितले. 

देशातील इटालियन पर्यटकांमध्ये कोरोना संसर्गा संदर्भात अभ्यासाचे निष्कर्ष सांगत आयसीएमआरने म्हटले की, जवळपासच्या लोकांशी संपर्क असणाऱ्या लोकांमध्ये कोरोना संसर्गाची अधिक प्रकरणे समोर आली आहेत. अशा परिस्थितीत, जवळच्या नातेवाईकांची भेट टाळणे, त्यांची कोरोना टेस्ट करणे आणि कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना आयसोलेशनमध्ये ठेवल्याने कम्युनिटी ट्रान्समिशन टाळणे सोपे होईल. 

भारतात सुरुवातीला मार्च-एप्रिल दरम्यान 16 इटालियन पर्यटकांमध्ये आणि भारतीय कोरोना संसर्ग झालेल्या लोकांवर सविस्तर अभ्यास करण्यात आला. त्यानंतर, आयसीएमआरचा हा अभ्यास इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये प्रसिद्ध झाला आहे. आयसीएमआरने नमूद केले की, बरेच कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रूग्णांमध्ये कोणतीच कोरोनाची लक्षणं आढळली नाहीत. त्यामुळे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग (संपर्क प्रसार) कोरोनाचा प्रसार थांबवणे सर्वात महत्वाचे आहे.

स्वाईन फ्लुच्या धर्तीवर उपचार

2009 मध्ये आलेला स्वाइन फ्लूचा संसर्ग आज ही कायम आहे. त्यामुळे, त्या परिस्थितीचा धडा घेत सरकारने आधीच खबरदारी घेतली आहे. आयसीएमआरने म्हटले की, सरकारने यावेळेस इंटेलिजेंट टेस्टिंग स्ट्रॅटेजी स्वीकारली आणि सर्व देशभर पसरणाऱ्या कोविड -19 या साथीच्या आजारांविरूद्धच्या लढाईत आपली तयारी अधिक बळकट केली. आज देशातील 432 सरकारी आणि 178 खासगी प्रयोगशाळांमध्ये दररोज 1.1 लाख नमुन्यांची चाचणी केली आहे.

this is how corona spread faster than its normal speed read full news

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : पंजाब हरियाणातील शेतकऱ्यांचा आज दिल्लीकडे मोर्चा

Supreme Court चे माजी न्यायाधीशच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात सर्वोच्च न्यायालयात; नेमकं काय घडलं?

AUS vs BAN 1st Test: बांगलादेश ऐतिहासिक विजयाच्या उंबरठ्यावर; ऑस्ट्रेलियाला रडवले, कसोटीचा इतिहास-भूगोल बदलणारा सामना...

Western Railway: ३० लाखांच्या गर्दीसमोर पश्चिम रेल्वे हतबल; २,५५९ पदे रिक्त, नियंत्रणासाठी कंत्राटी मनुष्यबळाचा आधार

UP Freedom Struggle Circuit: स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी आता पर्यटकांना अनुभवता येणार; यूपीमध्ये ‘स्वातंत्र्य संग्राम सर्किट’

SCROLL FOR NEXT