मुंबई: मुंबईत कोलकत्ता मेट्रो पॅटर्नच्या कलर कोडप्रमाणे प्रवाशांच्या वेळा निश्चित करून, मुंबईकरांना सरसकट लोकल प्रवासाची परवानगी देण्याचा प्रयत्न राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासनाचा सुरू आहे. मात्र, कोविड नियमावलीनुसार दिवसाला 22 लाखांच्या वर प्रवाशांना प्रवास करु देणे शक्य नसल्याचे रेल्वेने म्हटले आहे. त्यामुळे सरसकट लोकल प्रवासाचे त्रांगडे अजूनही कायम आहे. दुसरीकडे कोलकत्ता मेट्रो पॅटर्न तिकीट मुंबई लोकलसाठी कितपत प्रभावी ठरेल याबद्दल प्रवासी संघटनांनी वेगवेगळी मत व्यक्त केली आहे.
कोलकात्ता मेट्रोच्या धर्तीवर मुंबई लोकल प्रवासासाठी कलर कोडनुसार प्रवासाच्या वेळा निश्चित केल्या जाणार आहे. त्यामुळे ठराविक वेळेतच प्रवाशांना लोकलमध्ये प्रवास करता येणार आहे. या प्रणालीमुळे रेल्वे स्टेशनवर होणारी प्रवाशांची गर्दी टाळता येणे शक्य होईल. शिवाय या यंत्रणेमुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, खासगी कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी, सामान्य नागरिक यांचे वर्गीकरण करणे सोपे होणार असल्याचं सांगितल्या जात आहे.
मात्र, मेट्रोसाठी एक डोअर सिस्टिम मुंबईतील लोकलसेवेला लागू कशी होणार असा प्रश्न सर्वसामान्य प्रवासी विचारताना दिसताहेत. रेल्वे स्थानकावर अवैध प्रवासी, भिकारी, गर्दूल्ले आणि भटकी श्वानं यांचा मुक्तपणे वावर हे नेहमीचे चित्र आहे. रेल्वे यंत्रणा आजपर्यंत पूर्णपणे या लोकांचा बंदोबस्त करु शकली नाही याकडे काहींनी लक्ष वेधलं. शिवाय ही व्यवस्था लागू करण्यासाठी स्थानक बंदिस्त करावे लागेल, फलाटांवर प्रवेशासाठी एकच एंट्री आणि एक्सिट पाईट असावा लागणार. त्यामुळे गर्दीचे नियंञण चेंगराचेंगरीचे प्रकार टाळता येतील. मात्र, सध्या रेल्वे प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. अशातच कोलकात्ता मेट्रोच्या धर्तीवरचे मुंबईतील गर्दी पाहता आणि अपुरे पोलिस संख्याबळ, फलाटावर येण्यास चारही बाजूंनी मोकळ्या वाटा तर काही रेल्वे रूळावरुन थेट फलाटांवर येऊन लोकल धावत पकडतात. त्यामुळे मुंबई लोकलमध्ये असा काही प्रयोग यशस्वी होणे अशक्य आहे.
श्याम उबाळे, अध्यक्ष, कल्याण कर्जत कसारा रेल्वे प्रवासी संघंटना
मुंबई लोकल मार्गावरील प्रवासी संख्या लक्षात घेता. कोलकात्ता मेट्रो पॅटर्न मुंबई लोकलसाठी प्रभावी ठरणार नाही. त्यापेक्षा शासकीय, खासगी, कंपनीतील कर्मचारी आणि नागरिकांच्या प्रवासांच्या वेळांमध्ये बदल करावा, त्यासोबतच रेल्वे प्रशासनाकडे आधीच उपलब्ध असलेल्या तिकीट प्रणालीमध्ये ही बदल आवश्यक आहे.
सुभाष गुप्ता,अध्यक्ष, रेल यात्री परिषद
मुंबईमधील प्रवासी संख्या आणि गर्दी पाहता हा प्रयोग यशस्वी होणार नाही. पोलिसांचे अपुरे संख्याबळ यात नियोजन कोलमडून पडेल. कोरोना नसताना रेल्वे प्रशासनाला रेल्वेतील अपघात रोखता येत नाही तर हे कोलकत्ता मेट्रो धर्तीवर येथे प्रयोग हा मुंगेरीलाल के हसीन सपने यासारखेच आहे.
काजल पगारे, महिला संघटक कल्याण कर्जत कसारा रेल्वे प्रवासी संघंटना
कोलकत्ता मेट्रोने कलर कोडचे पास केले असले तरी एका मेट्रो मध्ये 400 प्रवासी मर्यादा आहे. तसेच प्रत्येक प्रवासींना स्मार्ट फोन वरून माहिती भरावी लागणार आहे. त्या माहितीनंतर त्यांना कलर कोडचे पास दिले जातील. मुंबई रेल्वे प्रवाशांची संख्या अनेक पटीने जास्त असली तरी आता रेल्वेला प्रवासी संख्या मर्यादित ठेवायला तंत्रज्ञान वावरावे लागणारच आहे. प्रत्येक स्टेशनसाठी प्रवासी संख्या मर्यादित ठेवणे आणि कलर कोड पास या दोन्ही गोष्टींसाठी ऑगस्टपासून आम्ही रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहोत.
मधु कोटीयन, अध्यक्ष, मुंबई रेल्वे प्रवासी संघटना
----------------------------------
(संंपादनः पूजा विचारे)
How effective Kolkata Metro ticket pattern Mumbai State and railways insist different color code tickets
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.