मुंबई

संजय दत्तच्या सुटकेचा तपशील द्या; राजीव गांधी हत्याकांडातील आरोपीची याचिका...

सुनिता महामुनकर

मुंबई : 1993 सालच्या बॉम्बस्फोट प्रकरणी अभिनेता संजय दत्तला टाडा न्यायालयाने हत्यारे कायद्यानुसार दोषी ठरविले होते. या प्रकरणी दत्तला सहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली होती. मात्र, दत्तची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने अपील याचिकेत पाच वर्ष केली होती. ही शिक्षा भोगण्यासाठी तो मे 2013 मध्ये येरवडा कारागृहात हजर झाला होता. शिक्षेदरम्यान अनेकदा दत्तला पॅरोल आणि फर्लो रजा मंजूर करण्यात आली होता. त्यानंतर चांगल्या वर्तणुकीमुळे त्याला तब्बल 256 दिवसांपूर्वीच कारागृहातून सोडण्यात आले होते. 

माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्या प्रकरणात आरोपी ए.जी.पेरारीवलन याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. ज्या बॉम्बच्या मदतीने गांधी यांची हत्या झाली त्याच्यासाठी वापरण्यात आलेल्या नऊ व्होल्ट्सच्या दोन बॅटरी पेरीवलनने पुरविल्या होत्या, असा आरोप त्याच्यावर आहे. ज्या वेळी घटना घडली तेव्हा तो एकोणीस वर्षाचा होता. मागील 29 वर्षांपासून तो चेन्नईमधील पुझल मध्यवर्ती कारागृहात आहे. हत्यारे कायद्याअंतर्गत त्यालाही शिक्षा सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, पेरीवलनने अभिनेता संजय दत्तच्या कारागृहातील सुटकेची माहिती मिळवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दत्त आणि माझ्या खटल्यात साम्य आहे, त्यालाही हत्यारे कायद्यामध्ये शिक्षा झाली होती. मात्र आता तो सुटला आहे. त्यामुळे या खटल्यातील कायदेशीर तरतुदी माझ्या सुटकेसाठी पडताळायच्या आहेत. तरी त्याची माहिती येरवडा कारागृह प्रशासनाला देण्याचे निर्देश द्यावे, अशी मागणी त्याने याचिकेत केली आहे. 

माहिती अधिकार कायद्यामध्ये त्याने अर्ज केला होता. मात्र, अर्जाची दखल घेतली नाही, असे त्याचे म्हणणे आहे. दत्तच्या सुटकेमध्ये बाधा आणण्याचा हेतू नाही, असा दावा त्याने केला आहे. अॅड. नीलेश उके यांच्यामार्फत केलेल्या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.
----
संपादन ः ऋषिराज तायडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Patas Sugar Factory: पाटस साखर कारखान्यात बगॅसला भीषण आग; ट्रक जळून खाक, अग्निशामक यंत्रणा उशिरा पोहोचली अन्..

Summer Holiday : शाळांना २ मेपासून उन्हाळी सुटी; नवीन शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून

Claude Mythos Leak : सायबर कंपन्यांना धक्का! AI क्लॉड मिथोस लीकमुळे शेअर मार्केट कोसळले; एका दिवसात १४.५ अब्ज डॉलर्सचे नुकसान

Latest Marathi News Live Update : अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांची आज SIT चौकशी होणार?

राष्ट्रवादी एकत्र येणार? चर्चांना उधाण; विलीनीकरणावर सुनील तटकरेंचे मोठे विधान, म्हणाले...

SCROLL FOR NEXT