CM Eknath Shinde News
CM Eknath Shinde News Esakal
मुंबई

Eknath Shinde: केंद्राकडून निधी कसा मिळवायचा? CM शिंदेंनी सांगितला फॉर्म्युला

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : महाराष्ट्रात सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसलेल्या एकनाथ शिंदे यांनी विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणावर केंद्राकडून निधी आणला. हा निधी आणण्यासाठी त्यांच्याकडं कोणतही जादूची छडी आहे, असा प्रश्न त्यांना एका जाहीर कार्यक्रमात विचारण्यात आला. यावर उत्तर देताना त्यांनी केंद्राकडून निधी कसा आणायचा याचा फॉर्म्युलाच सांगितला. (How to get funds from the Central govt CM Eknath Shinde told Formula)

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "ही कोणती जादू वैगरे नाही. आपण समोरच्याशी जसं वागता त्यावर बरंच काही अवलंबून असतं, म्हणजेच तुम्ही केंद्र सरकारशी कसं वागता ते महत्वाचं आहे. राज्याचा प्रमुख असण्याच्या नात्यानं आमची भूमिका खूपच महत्वाची असते. केंद्राशी तुमचे संबंध कसे आहेत, त्यावर बरंच काही अवलंबून असतं. त्यामुळं अहंकाराचा आपल्याला त्याग करावा लागेल, इगो आपल्याला सोडावा लागेल"

ऑनलाईन फेसबुकवरुन काम चालत नाही - मुख्यमंत्री

आम्हाला केंद्र सरकारच्या हातात हात घालून काम करावं लागेल, त्यांना विनंती केली पाहिजे, केंद्र सरकार ही खूप मोठी ताकद आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांना विनंती करण्यात आम्हाला काय अडचण आहे? गेल्या सरकारमध्ये मी देखील होतो पण त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांमध्ये इगो प्रॉब्लेम होता. त्यामुळंच आम्ही मागं राहिलो, त्यामुळंच महाराष्ट्रात केंद्राकडून पैसे येत नव्हते. जेव्हा आपण केंद्राकडं पैसे मागू, त्यांच्याकडं जाऊ, भेटू तेव्हाच ते मिळतील. आपल्याला घरीच थोडी कोणी पैसे आणून देणार आहे. घरात बसून हे सर्वकाही करता येत नाही, त्यासाठी मैदानात उतरावं लागतं. ऑनलाईन आणि फेसबूकवरुन काम चालत नाही, अशा शेलक्या शब्दांत एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.

दावोसमधून अशी मिळीली गुंतवणूक

दरम्यान, दावोसमध्ये जेव्हा मी गेलो होतो तेव्हा लोकांच्या मनात अनेक प्रश्न होते. महाराष्ट्रात उद्योगांच्या विकासाची मोठी संधी असतानाही उद्योग राज्यात येत नव्हते. तिकडे मला अनेक देशांचे पंतप्रधान, राष्ट्रप्रमुख आणि मंत्रीही भेटले, त्यांनी मला विचारलं की केंद्र सरकारशी, पंतप्रधान मोदींशी तुमचे संबंध कसे आहेत? त्यावर चांगले आहेत त्यांचा आम्हाला पूर्ण पाठिंबा आहे, असं मी त्यांना सांगितलं. फक्त एवढ्या विश्वासावर त्यांनी थेट आमच्याशी सुमारे १ लाख ३७ हजार कोटींचे सामंजस्य करार केले. या करारांनुसार आता कामांना सुरुवातही झाली आहे, असंही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

SCROLL FOR NEXT