monkey fever in Sindhudurg Success in gaining control kokan health marathi news 
मुंबई

Health News : उन पावसाचा खेळ सुरु असताना आरोग्य कसे जपावे? डॉक्टर काय सांगतात

सकाळ डिजिटल टीम

Health News : सध्या ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. त्‍यामुळे नागरिक सध्या सर्दी, खोकला आणि तापाने फणफणल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. वातावरणातील बदलांचा परिणाम शरीरावर होत असून हवेत जशी उष्णता वाढते त्‍या प्रकारे आरोग्‍यातही काही बदल होतात.

यामुळे डिहायड्रेशन, उष्माघात, भूक मंदावणे, रक्‍तदाब वाढणे, अॅसिडिटी, डोकेदुखी, अस्वस्थता, थकवा जाणवणे अशा समस्या जाणवत आहेत. याकडे दुर्लक्ष न करता त्‍वरित डॉक्‍टरांचा सल्‍ला घ्‍यावा, असे आवाहन तज्‍ज्ञांनी केले आहे. पावसाळ्यात खाण्यापिण्यासोबतच स्वच्छतेचीही काळजी घ्यावी लागते.

यामध्ये निष्‍काळजी केल्‍यास त्‍याचा फटका आरोग्‍याला बसतो. त्‍यामुळे घरी शिजवलेले ताजे अन्न खाणे, बाहरेचे उघड्यावरील चमचमीत पदार्थ खाणे टाळणे, बाहेरून आल्यावर हात-पाय स्वच्छ धुणे, पावसात भिजल्यास पूर्ण शरीर आणि डोके कोरडे करणे, अशी काळजी घेणे अतिशय आवश्यक असल्याचे जे जे रुग्णालयाचे पल्मनरी मेडिसीन विभागाचे छाती विकारतज्ज्ञ डॉ. रोहित हेगडे यांनी सांगितले.

लीलावती रुग्णालयाचे सल्लागार फिजिशियन डॉ. सी. सी. नायर म्हणाले, ‘‘अचानक हवामान बदलामुळे मानवी आरोग्यावर परिणाम होतो. अति उष्णतेच्या लाटेमुळे उष्माघाताचा त्रास होतो. त्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी समस्या वाढतात. वाढत्या तापमानामुळे हवेची गुणवत्ता बिघडते. फुप्फुसामध्ये संसर्ग आणि श्वसनासंबंधी विकारही होऊ शकतात. डिहायड्रेशनच्या रुग्णांची संख्या वाढली आहे, चक्कर येणे आणि उलट्या होणे ही लक्षणे दिसतात.

विषाणूजन्य आजारांना पोषक वातावरण

अपोलो स्पेक्ट्रा रुग्णालयातील इंटरर्नल मेडिसीन तज्‍ज्ञ डॉ. अमित शोभावत म्हणाले, ‘‘ऊन-पाऊस या विषम वातावरणामुळे विषाणूजन्य आजारांना पोषक वातावरण तयार झालेले असते. सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्णदेखील मोठ्या संख्येने वाढले आहेत. शिंकताना व खोकताना नाकासमोर रुमाल धरणे, हातांची स्वच्छता राखणे, आजारी व्यक्तींशी संपर्क टाळावा. कोणताही आजार अंगावर न काढता वेळीच वैद्यकीय सल्ला घ्यावा, तसेच तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषधोपचार करू नयेत.’’

शरीरातील पाणी आणि इलेक्ट्रॉलायटीस कमी होऊन किडनी आणि हृदयावर परिणाम होतो. त्यामुळे भरपूर पाणी पिणे, ज्यूस, लिंबूपाणी, नारळपाणी, ओआरएस घ्यावे.

- डॉ. मधुकर गायकवाड, मेडिसीन विभाग प्रमुख, जे. जे. रुग्णालय

गेल्या वर्षभरात आरोग्यविषयक समस्‍यांच्या सरासरीत वाढ झाली आहे. दर आठवड्याला जलजन्य आजारांचे अंदाजे १० ते १५ रुग्ण आढळून येत आहेत. अति उष्णतेपासून किंवा अचानक तापमानातून स्वतःचे संरक्षण करणे गरजेचे आहे.

- डॉ. नेहल शाह, सल्लागार बालरोगतज्ज्ञ, एनएचएसआरसीसी रुग्णालय

उन्हाळा, पावसाळा आणि नंतर हिवाळा यात मध्येच पावसाची सर येणे, ऊन पडणे यातून पाणी प्रदूषित होते. हेपेटायटीस ए आणि हेपेटायटीस ई हे दोन्ही यकृताचे आजार होतात. यात यकृताला संसर्ग होतो. शरीरात रक्तस्राव होणे, कॉलरा, हगवण, उलटी हे देखील आजार बळावतात. मच्छरांची पैदास वाढते. त्यामुळे मलेरिया, डेंगी आणि लेप्टोस्पायरोसिस हे आजार वाढतात.

- डॉ. हेमंत वाघ, युरोलॉजिस्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT