मुंबई ः लग्नानंतर अनैसर्गिक संबंधांसाठी आग्रह धरणाऱ्या आणि अत्याचार करणाऱ्या पतीविरुद्ध पत्नीने ट्रॉम्बे पोलिसांत तक्रार दिली आहे. विशेष म्हणजे, पतीचे आई-वडील आणि नणंद हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ करत असल्याचा आरोप महिलेने केला आहे. तसेच नवऱ्यानेही कायद्यात नसताना ट्रीपल तलाक दिल्याचा आरोप महिलेने केला आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी नवऱ्याला अटक केली आहे.
मिरा रोड परिसरात राहणारा 26 वर्षीय पीडित महिलेचा नवरा हा एका नामांकित बॅंकेत व्यवस्थापक आहे. वर्षभरापूर्वी आरोपी आणि पीडित महिलेचे लग्न झाले होते; मात्र हुंड्यासाठी नवऱ्याच्या घरातल्यांकडून मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता, तर पीडितेचा नवरा तिच्याकडे अनैसर्गिक संबंधांसाठी आग्रह धरीत होता. नकार दिल्यानंतरही तो तिच्यावर बळजबरी करायचा. त्यामुळे पीडित मुलगी ही नवऱ्यापासून स्वत:ला वाचविण्याचा प्रयत्न करीत होती. दरम्यान, दोघांमधील संबंध ताणले गेले होते. त्यानंतर त्यांनी पीडित मुलीचा छळ करण्यास सुरुवात केली. तिला माहेरून हुंडा घेऊन येण्यास सांगण्यात आले. तिने हुंडा आणण्यास नकार दिला असता शिवीगाळ करून शारीरिक व मानसिक त्रास दिला. नवऱ्याने तिला एका क्षणात स्वतःपासून वेगळे करण्यासाठी ट्रीपल तलाकही दिला. रोजच्या या त्रासाला कंटाळून अखेर पीडित मुलीने ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात पती, त्याचे आई-वडील, दीर आणि नणंदेविरोधात तक्रार नोंदवली. मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी नवऱ्याला अटक केली असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.
Husband arrested for unnatural abuse of wife In-laws also accused of harassment
-------------------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.