पत्नीला घरात परपुरुषासोबत पाहिलं; अन्...त्याचाच झाला गेम.. 
मुंबई

पत्नीला घरात परपुरुषासोबत पाहिलं; अन्...त्याचाच झाला गेम..

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : ऐरोलीतील चिंचपाडा भागात वास्तव्यास असणाऱ्या एका महिलेने अनैतिक संबंधातून आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचीच हत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलिसांनी आरोपी महिलेसह तिच्या प्रियकरास हत्येच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे.

आरोपी महिलेचे नाव लक्ष्मी वाघे असे असून रिक्षाचालक असलेल्या तिच्या प्रियकराचे नाव झिशान सिद्दीकी असे आहे. लक्ष्मी हिचा विवाह काही वर्षांपूर्वी रबाळे येथील कातकरी पाडा येथे राहणाऱ्या रुपेश वाघे याच्यासोबत झाला होता. मात्र त्या दोघांमध्ये सतत वाद होत असल्याने लक्ष्मी मुलीसह चिंचपाडा येथे आपल्या आईकडे राहण्यास गेली होती. यादरम्यान तिचे ऐरोलीतील रिक्षाचालक झिशान सिद्दीकी याच्यासोबत अनैतिक संबंध निर्माण झाले.

दरम्यान, २१ जानेवारी रोजी रात्री झिशान लक्ष्मीच्या घरी गेला असतानाच तिचा पती रूपेशदेखील आपल्या मुलीला भेटण्यासाठी तेथे आला. आपल्या पत्नीला परपुरुषासोबत पाहिल्याने रूपेशचा राग अनावर झाला व त्याने लक्ष्मीला शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर लक्ष्मीनेदेखील रागाच्या भरात रूपेशच्या डोक्‍यात कोयत्याने वार केले; तर तिचा झिशानने रूपेशच्या डोक्‍यात दगड घालून तेथून पलायन केले. त्यानंतर उपचारादरम्यान रूपेशचा मृत्यू झाला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महामुंबईला चटके तर नागपूर पुन्हा 'हॉट', विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा; अकोला, महाडमध्ये पारा ४५ अंशावर

Uday Samant Kagal : उदय सामंतांचे मुश्रीफांना बालेकिल्ल्यातच आव्हान, 'कागल मतदारसंघ शिवसेनेचा होईल'; मंडलिकांना पाठबळ

'प्रियांका चोप्रासोबतच्या किसिंग सीनवेळी...'अन्नू कपूर 15 वर्षापूर्वीच्या वादावर म्हणाले, ' माझ्यासोबत किसिंग करताना ती'

'Vaibhav Sooryavanshi चा तर मी फॅनच झालोय, तो खूपच...' पॅट कमिन्स १५ वर्षांच्या पोराची बॅटिंग बघून झाला फिदा; पाहा काय म्हणाला

Latest Marathi News Live Update: नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा कहर, पारा 44 अंश सेल्सिअसवर

SCROLL FOR NEXT