Raj Thackeray 
मुंबई

Raj Thackeray: राजकारणातून मी रिव्हर्स गिअर टाकला होता, पण एका व्यक्तीमुळे परत आलो; राज ठाकरेंचा मोठा खुलासा

Raj Thackeray About Politics: 2000 साली मी जेव्हा एका वेगळ्या पक्षात होतो. त्यावेळी त्या पक्षात जे काही सुरु होतं, हे पाहून मी रिव्हर्स गिअर टाकला होता. मला आता नको ते राजकारण असं वाटत होतं.

कार्तिक पुजारी

Raj Thackeray News: 2000 मध्ये मी राजकारणात रिव्हर्स गिअर टाकला होता, असं मोठं वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केलं आहे. एका कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. केवळ एका व्यक्तीमुळे मी राजकारणात परत आलो, त्यांचं नाव साजिद नाडियाडवाला असं आहे. हेही त्यांची एक बाजू आहे, असं देखील राज ठाकरे म्हणाले आहेत.

2000 साली मी जेव्हा एका वेगळ्या पक्षात होतो. त्यावेळी त्या पक्षात जे काही सुरु होतं, हे पाहून मी रिव्हर्स गिअर टाकला होता. मला आता नको ते राजकारण असं वाटत होतं. मला राजकारण करण्याची काहीच इच्छा राहिली नव्हती. मला तिथे जायचचं नव्हतं. मला असला गोंधळ घालून काही करायचं नाही. मी हळूहळू राजकारण सोडून देणार होतो, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

मी आणि साजिद नाडियाडवाल त्यावेळी अनेकदा भेटायचो. आपल्याला फिल्म प्रोडक्शन कंपनी सुरु करायची आहे. मला फिल्म प्रोडक्शन करायचं आहे, असं मी त्यांना सांगायचो. पण, एकेदिवशी मी पुन्हा राजकारणात वळण्याच कारण हे साजिद नाडियाडवाल आहेत, असं मोठं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं. यावेळी साजिद नाडियाडवाल व्यासपीठावर उपस्थित होते.

साजिद नाडियाडवाला यांनी मला सांगितलं की, मी प्रोड्युसर आहे. प्रोड्युसर कशापद्धतीने काम करतो हे मला माहिती आहे. काय काय करावं लागतं हे मला माहिती आहे. राज ठाकरे प्रोड्युसर बनून त्या गोष्टी करताना मला पाहवणार नाही. तुम्ही ज्याठिकाणी आहात त्याठिकाणी राहा. फिल्म बनत राहतील. पुढेही बनतील. त्यामुळे मी पुन्हा राजकारणात सक्रीय झालो, असा मोठा खुलासा राज ठाकरे यांनी केला आहे. राज ठाकरेंच्या वक्तव्यांमुळे नव्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: नीरज चोप्राचे 'सुवर्ण' हुकले, Rumesh Pathirage ने मारली बाजी; पाकड्या अर्शद नदीमची लाज गेली, वाचा काय झालं...

TEJASWIN SHANKAR HISTORICAL MEDAL: तेजस्विन शंकरने इतिहास घडवला! खडतर अशा डेकॅथलॉन स्पर्धेत भारताला जिंकून दिले पहिले पदक

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

SCROLL FOR NEXT