मुंबई

NCBला रेव्ह पार्टीची माहिती देण्यासाठी गेलो होतो: भानुशाली

नवाब मलिक यांनी भाजप एनसीबीचा गैरवापर करत असल्याचा आरोप केला होता.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राष्ट्रावादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केलेला भाजपचा कार्यकर्ता मनीष भानुशाली यानं आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. साम टिव्हीशी बोलताना त्यांनं सांगितलं की, या पार्टीची माहिती एनसीबीला देण्यासाठी आपण तिथं गेलो होतो. तसेच या कामामुळं आता आपल्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

भानुशालीनं सांगितलं, " मी भाजपचा एक कार्यकर्ता आहे. मुंबईत ड्रग्ज पार्टी होणार असल्याची मला माहिती मिळाली होती. ही माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यांसोबत शेअर केली. आपले तरुण या नरकात ढकलले जात आहेत हे थांबवण्यासाठी मी हे पाऊल उचललं. पण या गोष्टीमुळं माझ्या जीवाला ड्रग्ज तस्करांपासून धोका निर्माण झाला आहे. कारण मी एनसीबीला त्यांच्या कारस्थानांची माहिती देऊन त्यांचा भांडोफोड केला आहे.

आमच्या माहितीच्या आधारे एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी खूपच चांगलं काम केलं आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडे दोन-तीन इनपूटही आले होते त्याच्या आधारे त्यांनी ही धाड टाकली. यामुळे जे आरोपी आहेत ते सर्वजण पकडले गेले आहेत. २ ऑक्टोबर रोजी सुट्टीच्या दिवशी मी एनसीबीच्या कार्यालयात गेलो आणि त्यांना ही खबर दिली. यावेळी त्यांनी याची आम्हाला संपूर्ण माहिती द्या असं सांगत त्यांच्यासोबत घेऊन गेले.

२०१० मध्ये मनीष भानुशाली भाजपकडून निवडणूक लढवली आहे. सध्या माझ्याकडे पक्षाचं कुठलंही पद नाही त्यामुळे मी साधा सामान्य कार्यकर्ता आहे. पक्षाचा कार्यकर्त्या असण्यापूर्वी मी देशाचा सजग नागरिक असून देशात चुकीच्या कारवायांबाबत माहिती मिळाल्यानं ती शेअर करणं गरजेचं समजतो, असंही भानुशाली यांनी सांगितलं.

मलिकांनी पत्रकार परिषदेत काय आरोप केला?

नवाब मलिक म्हणाले, "एएनआयने असा व्हिडीओ रिलीज केला की ज्यामध्ये अरबाज मर्चंटला घेऊन जाताना दिसून आलं. पहिल्या व्यक्तीचं नाव आहे के पी गोसावी तर मनिष भानुसाली हे दुसऱ्या व्यक्तीचं नाव आहे. तोही एनसीबीचा अधिकारी नाहीये. तर तो भाजपचा जिल्हा उपाध्यक्ष आहे. त्याचा फोटो देशाच्या पंतप्रधानासोबत फोटो आहे, अमित शहांसोबत आहे. देवेंद्र फडणवीसासोबत आहे. गुजरातच्या अनेक नेत्यांसोबत आहे. भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांसमवेत आहे. एनसीबीने हे स्पष्ट करावं की, हे दोघे कोण आहेत आणि यांचा तुमच्याशी काय संबंध आहे?"

मनीष भानुशालीवर भाजपचं म्हणणं काय?

भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले, "मनीष भानुशालीबद्दल माहिती नाही. मला कल्पना नाही. एनसीबी कार्यालय खुलासा करेल. कोणाला पाठिशी घालायचं कारण नाही. नवाब मलिक यांच्यावर जावयावर झालेली कारवाई अजून त्यांच्या पचनी पडलेली नाही. तो पोटशूळ त्यांच्या वक्तव्यातून दिसतोय" असे प्रवीण दरेकर म्हणाले. असं कधीच या देशात झालेलं नाही. सीबीआयची कारवाई झाली की सीबीआय, ईडीवर बोलायचं आता एनसीबीची कारवाई झाल्यावर तसंच चित्र उभ करायचा प्रयत्न होतोय" असे दरेकर म्हणाले. मनीष भानुशालीला भेटल्याचं मला तरी आठवत नाही"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT