Rafale
Rafale 
मुंबई

चीनला उत्तर देण्यासाठी घातक 'राफेल'ची १०१ फाल्कन्स स्क्वॉड्रन

दीनानाथ परब

नवी दिल्ली: इंडियन एअर फोर्सने (IAF Rafale) 'राफेल' फायटर विमानांची दुसरी स्क्वॉड्रन १०१ अंबालामध्ये तयार केली आहे. पश्चिम बंगालच्या हसीमारा (hasimara) एअर बेसवर ही दुसरी १०१ स्क्वॉड्रन तैनात करण्यात येईल. चीनला लागून असलेल्या पूर्वसीमेसाठी ही स्क्वाड्रन बनवण्यात आली आहे. राफेलची पहिली स्क्वॉड्रन '१७ गोल्डन अ‍ॅरो' अंबालामध्ये (golden arrow squadron) कार्यरत झाली आहे. या स्क्वॉड्रनमध्ये १८ फायटर विमाने आहेत. (iaf set to deploy rafale squadron to hasimara air base on eastern front with china)

१०१ फाल्कन्स स्क्वॉड्रनमध्ये पाच विमाने असतील. भारताने फ्रान्सबरोबर ३६ राफेल विमाने विकत घेण्याचा करार केला आहे. त्यातील २३ विमाने भारतीय हवाई दलाकडे सुपूर्द करण्यात आली आहे. उर्वरित १३ विमाने पुढच्यावर्षीच्या एप्रिलआधी IAF च्या ताफ्यात दाखल होतील.

हसीमारा एअर बेसवर राफेलची १०१ स्क्वॉड्रन कार्यरत करण्याचा कार्यक्रम कोविडमुळे काहीसा लांबणीवर गेला होता. पण महिन्याभराच्या आत हा कार्यक्रम होईल, असे सूत्रांनी सांगितले. राफेल विमाने निवृत्त होणाऱ्या मिग-२१ फायटर विमानांची जागा घेतील. ग्रुप कॅप्टन रोहित कटारिया १७ स्क्वॉड्रनचे कमांडिंग ऑफिसर आहेत. ग्रुप कॅप्टन नीरज झांब १०१ स्क्वॉड्रनचे नेतृत्व करत आहेत. हसीमारा आणि अंबाला हे ४.५ जनरेशन राफेल फायटर विमानांचे मुख्य बेस असतील. गरज असेल तेव्हा, हे मल्टीरोल फायटर विमान देशाच्या कुठल्याही भागातून उड्डाण करुन शत्रूवर प्रहार करण्यास सक्षम आहे. राफेलच्या देखभालीसाठी हँगर, शेल्टर आणि पायाभूत सुविधा दोन्ही एअर बेसवर उभारण्यात आल्या आहेत. हसीमारा एअर बेस सिक्कीम, भूतान आणि तिबेट या ट्राय जंक्शनच्या जवळ आहे. १९६२ सालच्या भारत-चीन युद्धानंतर हा एअर बेस बनवण्यात आला होता.

चीनजवळ असलेल्या तेजपूर, चाबुआ येथे आधीपासूनच सुखोई-३० एमकेआय विमाने तैनात आहेत. राफेलच्या समावेशामुळे चीन विरोधात भारताची ताकत आणखी वाढणार आहे. अत्याधुनिक रडार, मिसाइल्स, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टिमने राफेल सुसज्ज आहे. शत्रुच्या विमानांना राफेलची इलेक्ट्रॉनिक सिस्टिम जॅम करणे शक्य होणार नाही. राफेलमध्ये ३०० किमीपर्यत हल्ला करुन शकणारं स्काल्प मिसाइल आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: उदयनराजेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी कराडमध्ये दाखल

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT