मुंबई

कोरोना चाचण्यांसाठी पालिकेच्या रुग्णालयावर ICMRचा विश्वास अधिक

भाग्यश्री भुवड

मुंबईः  कोरोनावरील लसीच्या मानवी चाचणीचा दुसरा- तिसरा टप्पा मुंबईतील पालिकेच्या केईम आणि नायर रुग्णालयात होणार आहे. 20 ते 50 वयोगटातील सुदृढ व्यक्तींवर हा प्रयोग होणार आहे. 

देशभरातील 10 सेंटरपैकी मुंबईतील केईएम हॉस्पिटल आणि नायर रुग्णालयाची चाचणीसाठी निवड करण्यात आली आहे. पुढच्या आठवड्यापासून पुण्याच्या सिरम इन्स्टिट्युट आणि ब्रिटनची ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी बनवत असलेल्या कोरोना लसीची दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी देशात आठवडाभरात सुरु होणार आहे. 

"कोविशिल्ड वॅक्सिन" असे या लसीचे नाव असून देशभरातील 10 सेंटरमध्ये एकूण 1600 निरोगी लोकांवर लसीची एकाच वेळी चाचणी घेतली जाणार आहे. मुंबईच्या केईएम रुग्णालयामधील 160 (निरोगी लोक) स्वयंसेवकांवर लसीची चाचणी होणार आहे.

आयसीएमआरच्या सूचनांनुसार, सिरम  इन्स्टिट्युटने तयार केलेल्या लसीच्या चाचणीसाठी देशभरातील 10 सेंटर्समध्ये ही चाचणी घेतली जात आहे. या चाचणीचा पहिला टप्पा यूकेमध्ये पार पडला असून दुसरी चाचणी यूकेमधील 10 हजार लोकांवर सुरु आहे. तसेच, युएसए आणि ब्राझिलमध्ये देखील या लसीची चाचणी घेण्यात येईल. 

भारतातील लसीची चाचणी करण्यासाठी निवडण्यात आलेले सेंटर्स

  • केईएम रुग्णालय
  • नायर रुग्णालय
  • बीजे मेडिकल पुणे
  • एम्स नवी दिल्ली
  • पाटणा मेडिकल कॉलेज
  • सरकारी रुग्णालय नागपुर
  • पीजीआय चंदिगढ
  • क्षयरोग रिसर्च सेंटर चेन्नई
  • जेएसएस मेडिकल कॉलेज मैसूर

क्लिनिकल ट्रायल ऑगस्ट महिन्याच्या अखेर पर्यंत किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरु होणार आहे. 

आयसीएमआरचा पालिका रुग्णालयांवर विश्वास अधिक

सर्व स्वयंसेवकाच्या संमतीनेच ही चाचणी केली जाणार आहे. देशभरातून या मानवी चाचणीसाठी केईएम आणि नायरची निवड करण्यात आली आहे. यावरुन आयसीएमआरचा पालिका रुग्णालयांवर अधिक विश्वास असल्याचे सिद्ध झाले आहे. शिवाय, मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांची विश्वासार्हता यातून सिद्ध झाले आहे. आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्वानुसार, सर्व चाचण्या केल्या जातील, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त (आरोग्य) सुरेश काकाणी यांनी दिली आहे.

दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल मानवी चाचणी केली जाईल. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची ही ट्रायल आहे. प्रत्येक सेंटरमध्ये 160 सुदृढ स्वयंसेवकावर ही चाचणी केली जाईल. कोविशिल्ड वॅक्सिन दिली जाईल, असं   केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितलं आहे.

(संपादनः पूजा विचारे)

ICMR trust in municipal hospital for corona tests

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; लेकीच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या महिलेला भरीव मदत

Pune News : विनापरवाना लावणीचा कार्यक्रम; मंडळाच्या अध्यक्षांसह नृत्यांगना राधा पाटील यांच्यावर गुन्हा दाखल

Social Media: 'Likes' मुळे वाढतोय मानसिक ताण? Post's च्या मोहात अडकतात डिप्रेशनग्रस्त लोक; संशोधनातून धक्कादायक खुलासा!

Marathi News Live Updates: तळेगाव ढमढेरे परिसरात विजेमुळे ग्रामस्थ त्रस्त

आई म्हणाली ‘चॉकलेट बंद कर’; स्क्वॉशपटू अनाहतने थेट न्यूट्रिशनिस्टलाच फोन केला! नेमकं काय घडलं? Viral Video

SCROLL FOR NEXT