Mumbai High Court Sakal media
मुंबई

अर्धी शिक्षा भोगलेल्या कैद्याला गंभीर खटल्यातही जामीन द्यावा लागेल : उच्च न्यायालय

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - गुंतवणुकदारांकडून कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अंडरट्रायल कैद्याने जास्तीत जास्त शिक्षेच्या अर्धी शिक्षा पूर्ण केली असेल, तर त्याला जामीन नाकारता येणार नाही, असं न्यायालयाने म्हटलं आहे.

महाराष्ट्र ठेवीदारांचे हित संरक्षण अधिनियम 1999 अन्वये आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जामीन अर्ज फेटाळण्यामागे त्याच्या आरोपाचे गांभीर्य हे कारण असू शकत नाही. त्याला CrPC कलम 463A अंतर्गत दिलासा द्यावा लागेल, असे न्यायालयाने म्हटले आहे.

463A कलमात अशी तरतूद आहे, की जर आरोपीने कमाल शिक्षेच्या अर्धी शिक्षा भोगली असेल तर त्याला जामिनावर सोडावे लागेल. आरोपी सागर विलास तोटे याचा गंभीर फसवणुकीच्या गुन्ह्यात सहभाग असल्याचा सरकारी वकिलांचा युक्तिवादही न्यायालयाने फेटाळून लावला. पोलिसांना आरोपीची कोणतीही मालमत्ता अद्याप जप्त करता आलेली नाही.

न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी सतेंदर कुमार अंतील विरुद्ध सीबीआय या खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा संदर्भ देत म्हटले की, जामीन न देण्यामागे आरोपाचे गांभीर्य हे कारण असू शकते असे त्यांना वाटत नाही. आरोपीला CrPC च्या कलम 463A अंतर्गत जामिनावर सोडावे लागेल, कारण त्याने आधीच अर्धी शिक्षा भोगली आहे.

याप्रकरणात 2018 मध्ये बदलापूर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीविरुद्ध आयपीसीच्या कलम 420 आणि 406 सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंरक्षण कायदा 1999 च्या कलम 3 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशा प्रकरणात जास्तीत जास्त सात वर्षांची शिक्षा होऊ शकते. आरोपी चार वर्षांहून अधिक काळ तुरुंगात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

झारखंडमध्ये मंत्र्याचं निधन, छातीतली कळ नॉर्मल समजून सहन करत राहिले, २ तासांनी तीव्रता वाढली अन्...

Marathi News Live Updates : विद्यानंद बापटांना मारहाण करणाऱ्याचा चांदीचं कडं देऊन सत्कार करणार : संग्राम भंडारे

Nashik Accident: गोदाघाटावर थरार! गांधी तलावात पाच मुले बुडू लागली; चार जीवरक्षकांनी वाचविले चौघांचे प्राण, एकाचा मृत्यू

Manoj Jarange: ‘मुंबईला जाण्यापासून रोखण्याचे स्वप्न पाहू नका’; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, सलाइन-पाणीही बंद

Nepal Floods: माणुसकीचे दर्शन! कुटुंबाबरोबरच पूरग्रस्तांच्या शोधासाठी प्रयत्न; आप्त हरवले...तरीही इतरांसाठी धडपड

SCROLL FOR NEXT