...तर साडेसहा लाख नागरिकांचे जीव वाचवता येतील! दिल्ली आयआयटीचा अहवाल 
मुंबई

...तर साडेसहा लाख नागरिकांचे जीव वाचवता येतील! दिल्ली आयआयटीचा अहवाल

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : लॉकडाऊनदरम्यान प्रदूषणात लक्षणीय घट झाली आहे, हे प्रमाण असेच कमी ठेवण्यात यश आल्यास देशात दरवर्षी तब्बल साडेसहा लाख नागरिकांचे जीव वाचवता येतील, असे दिल्ली आयआयटीने म्हटले आहे. आयआयटी दिल्ली, चीनमधील शांघायचे फुदान विद्यापीठ आणि शेन्झान पॉलिटेक्निक या संस्थांनी केलेल्या अभ्यासाचा अहवालात हे नमूद केले आहे. 

कोरोनाच्या थैमानामुळे देशात लॉकडाऊन जारी झाल्यावर सर्व प्रकारची वाहतूक, उद्योगांवर निर्बंध घालण्यात आले. त्यामुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने संबंधित आजारांमध्ये तब्बल 52 टक्के घट झाली. प्रदूषणातून होणाऱ्या मृत्यूंमध्ये चार पटींनी घट झाल्याच या अहवालात म्हटले आहे. 

संशोधकांनी पीएम 10, पीएम 2.5 , कार्बन मोनिऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, ओझोन आणि सल्फर डायऑक्साईड या प्रदूषक घटकांवर लक्ष केंद्रित केले होते. 16 मार्च 2017 ते 14 एप्रिल 2020 या तीन वर्षांत देशातील 22 शहरांत हा अभ्यास करण्यात आला. त्याबाबतचा अहवाल ’इफेक्ट ऑफ रेस्ट्रिक्टेड एमिशन ड्युरिंग कोव्हिड-19 ऑन एअर क्वालिटी इन इंडिया’ या शीर्षकाखाली जनरल एल्सेव्हिअर पब्लिक हेल्थ इमर्जन्सी कलेक्शन या वैज्ञानिक नियतकालिकात काही महिन्यांपूर्वी प्रसिद्ध करण्यात आला. या अभ्यासात संशोधकांनी 2017 ते 2019 दरम्यानच्या प्रदूषणाची तुलना या लॉकडाऊनमधील प्रदूषणाशी केली. द लॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थ जर्नलमध्ये 2017 मध्ये प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, भारतात जवळपास 12.4 लाख मृत्यू वायुप्रदूषणामुळे झाले होते. 

वायुप्रदूषणातील घट

  • उत्तर भारत       44 टक्के 
  • दक्षिण भारत     33 टक्के 
  • पश्चिम भारत    32 टक्के 
  • पूर्व भारत         29 टक्के 
  • केंद्रीय भारत     15 टक्के
  • संपूर्ण देश        30 टक्के 


एका महिन्यात कमी झालेले प्रदूषणाचे प्रमाण असेच घटत राहिल्यास पुढील एका वर्षात देशातील 6.5 लाख लोकांचे जीव वाचवण्यात मदत होईल.
- श्रीहरी कोटा, आयआयटी दिल्ली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain: पावसात वाघोली ठप्प! पुणे-अहिल्यानगर महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी; वाहनचालकांची मोठी गैरसोय

SIP Investment: दरमहा 10 हजार रुपये गुंतवले तर 1 कोटी कधी होतील? पाहा सोपं गणित

Pune Traffic Jam : पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी तीव्र वाहतूक कोंडी; वाढलेल्या वाहनांमुळे मध्यवर्ती भाग व उपनगर ठप्प

IND vs ENG 2nd T20I Pitch Report: दुसऱ्या टी-20मध्ये फलंदाजांचा बोलबाला की गोलंदाजांची कमाल? जाणून घ्या Pitch Report

Latest Marathi Live Update : मुंबईत ताज हॉटेलसमोरचं मोठं झाड कोसळलं, गाडीचं नुकसान

SCROLL FOR NEXT