मुंबई

Ajit Pawar : "सुर्यानं झेल घेतला नसता तर रोहित शर्मानंच नाहीतर आम्ही पण..."; अजित पवारांची विधान भवनात फटकेबाजी

T20 क्रिकेट वर्ल्डकप जिंकणाऱ्या टीमचा आज मुंबईतील विधीमंडळात स्वागत करण्यात आलं.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : T20 क्रिकेट वर्ल्डकप जिंकणाऱ्या टीमचा आज मुंबईतील विधीमंडळात स्वागत करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषद सभापती नीलम गोऱ्हे यांच्यासह सर्व आमदार आणि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी अजित पवारांनी आपल्या भाषणातून सूर्यकुमार यादव याच्यावर एक मिश्किल टिप्पणी केली. (If Surya had not taken that catch Ajit Pawar made funny comment in Vidhan Bhavan during Welcome felicitation of team india)

अजित पवार म्हणाले, सूर्यकुमार यादव यानं ज्या प्रकारे तो झेल घेतला तो घेताना सीमारेषेपार त्याचा पाय जरी टेकला असता तरी आज आपल्याला हा दिवस पाहायला मिळाला नसता. त्यामुळं सूर्यकुमार यादवच खूप खूप अभिनंदन संपूर्ण भारतीयांचं लक्ष तुझ्याकडं लागून होतं. रोहितनं सांगितलंच की तो तू घेतला नसतास तर तुला बघितलं असतंच. पण केवळ रोहितनंच नव्हे तर आम्ही सर्वांनीच तुला बघितलं असतं.

आमचे लोक फार वेडे आहेत जिंकल्यानंतर इतका उदो उदो करतात आणि हारल्यानंतर दगड मारायला कमी करत नाहीत. आपल्याकडं खिलाडूपणा पहायाला मिळत नाही, असं अजित पवार यावेळी म्हणाले.

वानखेडे स्टेडियमवर ८३ मध्ये देखील अशीच गर्दी झाली होती. आत्ता सूर्यकुमार यादवनं जी कामगिरी केली तीच कामगिरी त्यावेळी कपिल देव यांनी केली होती, अशी आठवण यावेळी अजित पवार यांनी सांगितली.

रोहित आता यापुढं T20 सामने खेळणार नाही. पण हे सामने बघत असताना रोहितची आठवण आल्याशिवाय भारत कधीही गप्प बसणार नाही. त्यामुळं मी मनापासून त्याच्या टीमचं कौतुक करतो आणि अभिनंदन करतो. येणाऱ्या वाटचालीत त्याचं स्वप्न साकारण्यासाठी शुभेच्छा देतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पंचवटीमध्ये मुसळधार पावसानंतर गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ.

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT