illegal liquor seized sakal media
मुंबई

गोव्यातून येणाऱ्या अवैध मद्य वाहतुकीवर मोठी कारवाई; 57 लाखांचा साठा जप्त

31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

प्रशांत कांबळे ः सकाळ वृत्तसेवा

मुंबई : नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येची झिंग चढवण्यासाठी गोवा राज्यातील (Goa) उत्पादित मद्याची खेप महाराष्ट्रात चोरट्या मार्गाने आणण्याचा प्रयत्न राज्य उत्पादन शुल्क (Maharashtra excise department) विभागाच्या मुंबईतील भरारी पथकाने हाणून पाडला आहे. गोवा राज्यातून बेळगाव मार्गे मिरज व त्यापुढे राज्यात विदेशी मद्याची बियर बॉक्स (international liquor) घेऊन दाखल होणारा ट्रेलर पकडण्यात आले आहे. त्यामधून तब्बल 57 लाखांचा मद्यसाठ (illegal liquor seized) जप्त करण्यात आला आहे. (illegal liquor seized by Maharashtra excise department)

राज्य शासनाचा महसूल बुडवून गोवा राज्यातून आयात केलेल्या व फक्त गोवा राज्यातच विक्रीकरिता निर्मिती केलेल्या मद्यसाठ्याला नववर्षच्या पूर्वसंध्येला राज्यात जादा दराने हे मद्य विकण्याचा प्रयत्न केला जाणार होता मात्र, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळालेल्या गुप्तमाहितीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातील मिरजकडून पंढरपूरकडे जाणाऱ्या संशयित वाहनांची तपासणी दरम्यान राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेल्या बिदेशी मद्याचे 300 बॉक्स व तीव्र बीअरचे 300 बॉक्स असे एकूण 600 बॉक्स व एक भ्रमणध्वनी संच तसेच एक मालवाहक वाहन असा एकूण 56 लाख 74 हजार 600 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी अवैध बिअर साठ्याची वाहतूक करणारा ट्रेलर चालक गुरुमुख हरि सिंह (वय ४४) वर्ष यास अटक करण्यात आले असून त्याच्या व इतर फरार संशयित आरोपींच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा, 1959 अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात आल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने सांगितले आहे. सांगलीच्या अधिक्षक संध्याराणी देशमुख यांच्या मार्गदर्शनात भरारी पथकाचे प्रमुख निरीक्षक संताजी लाड, तसेच दुय्यम निरीक्षक प्रमोद कांबळे, त्याचप्रमाणे जवान सर्वश्री अमोल हिप्परकर आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

अंधेरी पूर्व भागातही अवैध मद्यावर कारवाई

राज्य उत्पादन शुल्कच्या मुंबईतील भरारी पथकाने बुधवारी अंधेरी पूर्व भागातील अष्टविनायक हॉसिंग सोसायटी, मध्ये छापा घालून परदेशी स्कॉच मद्याने भरलेल्या 23 सिलबंद बाटल्या, भारतीय बनावट विदेशी मद्याच्या 4 सिलबंद बाटल्या, परदेशी स्कॉचच्या मद्याच्या उच्च प्रतीच्या रिकाम्या बाटल्या, विविध ब्रॅण्डच्या परदेशी स्कॉच मद्याचे मोनोकार्टून, विविध ब्रॅण्डच्या परदेशी स्कॉच मद्याच्या बाटल्यांची बुचे, लेबल, फनेल, टोचा, टेप, ग्लुगन मशीन, हेअर ड्रायर मशीन इत्यादी साहित्य असा एकूण 2 लाख 34 हहर 720 रुपये किंमतीचा मद्यसाठा जप्त केला आहे. याप्रकरणी सुनिल उक्का चव्हाण, रामा गणेश परमार यांना अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd ODI: विराट कोहलीचा चौकार अन् मोडला राहुल द्रविडच्या नावावरील मोठा विक्रम! इंग्लंडमध्येही ठरला 'किंग'

IND vs ENG 2nd ODI: अनपेक्षित... भारतीय संघात एक बदल; विजयी संघात बदल करण्याची वेळ का आली? शुभमन गिल म्हणाला...

भारतातून OnePlus ची एक्झिट? 2027 पर्यंत कंपनी बंद होणार असल्याची चर्चा; ज्यांच्याकडे आत्ता मोबाईल आहे त्यांनी काय करायचं? वाचा

Latest Marathi News Live Update : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सिया आणि चेतनची न्यायालयीन कोठडी कायम

Varandha Ghat Landslide Risk: वरंधा घाटात दरडींचा धोका कायम; रस्त्याशेजारील मातीचे ढिगारे तातडीने हटवण्याची मागणी

SCROLL FOR NEXT