Mumbai Rain Sakal
मुंबई

Mumbai Rain: मुंबईकरांना IMD चा इशारा! पुढील 3 ते 4 तासांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, काळजी घेण्याचा सल्ला

IMD Tuesday warned Mumbai: भारतीय हवामान विभागाने मंगळवारी मुंबईसाठी इशारा जारी केला आहे.

कार्तिक पुजारी

मुंबई- सोमवारी मुंबई शहर, उपनगर आणि नवी मुंबईत आलेला पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यातच भारतीय हवामान विभागाने मंगळवारी मुंबईसाठी इशारा जारी केला आहे. पुढील तीन ते चार तासात मुंबईत सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच मध्यम पाऊस आणि विजा कडाडण्याची शक्यता आहे.

पुढील तीन ते चार तास खबरदारी घेण्याचा सल्ला आयएमडीने मुंबईकरांना दिला आहे. आयएमडीने सांगितलंय की, ४०-५० किमोमीटर प्रति तास या गतीने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे घराच्या बाहेर पडणाऱ्या लोकांनी काळजी घ्यावी. तसेच आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे. वादळी वाऱ्यांसह पाऊस आणि आकाशात विजा चमकणार आहेत. मुंबई आणि उपनगरातील बंदिस्त भागांमध्ये जोराच्या वाऱ्याचा प्रभाव जास्त पाहायला मिळणार आहे.

सोमवारी सायंकाळी चारच्या सुमाराज मुंबई आणि उपनगरामध्ये वादळी वारे आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. त्यामुळे लोकांची तारांबळ उडाली. शिवाय काही ठिकाणी अपघाताच्या घटना देखील घडल्या. घाटकोपर येथे जवळपास १२०*१२० महाकाय आकाराचे जाहिरातीचे फलक पेट्रोल पंपावर कोसळले. त्यामुळे मोठी जीवितहानी झाली. या पार्श्वभूमीवर आयएमडीचा आजचा इशारा महत्वाचा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : २०१६ला नीटचा पेपर फुटला तेव्हा PM मोदींना कॉल केलेला; राज ठाकरे काय म्हणाले?

Kolhapur Ambabai Temple : अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत मोठा निर्णय! मूळ ढाच्याला बाधा न आणता काम करण्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे 'पुरातत्त्व'ला निर्देश

Bhiwandi Building Collapse: ढिगाऱ्यातही जिवंत राहिली आईची माया, भिवंडी दुर्घटनेतील 'त्या' प्रसंगाने सर्वांचे डोळे पाणावले; काय घडलं?

Army Major Accident : उंटाला धडकली आर्मी मेजरची भरधाव कार, महिन्याभरापूर्वी लग्न झालेल्या मेजरचा जागीच मृत्यू, दोन लेफ्टनंट गंभीर जखमी

R. Ashwin: भुवीला पुनरागमनाचा सल्ला, वैभव सूर्यवंशीला डच्चू! 2027 वर्ल्ड कपसाठी अश्विनचा BCCI ला मोठा सल्ला; पाहा कोण IN, कोण OUT

SCROLL FOR NEXT