मुंबई

सुरतेच्या लुटीमुळे मुंबई झाले व्यापाराचे केंद्र

सकाळ वृत्तसेवा


    छत्रपती शिवरायांनी सुरतेची दोन वेळा केलेली लुट हि मध्ययुगीन इतिहासातील एक मोठी घटना म्हणून पाहिली जाते. सुरतेच्या लुटीमुळे मुघल बादशहा औरंगजेबाची मोठी नाचक्की झाली. कारण सुरत हे मध्ययुगीन काळातील भारतातील एक मोठे व्यापारी केंद्र व मोठे बंदर होते. सुरतेतून मुघल साम्राज्याला मोठा महसुल मिळत असे. याच सुरतेवर 1664 साली शिवरायांनी हल्ला करत सुरतेची लुट केली. त्याला कारण ही तसेच होते मोघल सरदार शाहिस्तेखानाची स्वारी. शाहिस्तेखानाने शिवरायांचा नायनाट करण्यासाठी पुण्याच्या लाल महालात मुक्काम ठेवला. जवळपास 3 वर्षे खान स्वराज्यात लुटमार करत होता. पण शिवरायांनी एका रात्री खानाची बोटे तोडून त्याला जन्माची अद्दल घडविली. त्यानंतर मोघलांना धडा शिकविण्यासाठी 1664 मध्ये शिवरायांनी सुरतेची लुट केली.

पुढे मोघल सरदार जयसिंग याने स्वराज्यावर आक्रमण केले. त्यात पुरंदरचा मोठा तह शिवरायांना करावा लागला. या तहानुसारच शिवरायांना औरंगजेबाच्या वाढदिवसाला गेल्यानंतर आग्य्राच्या किल्ल्यात केैद केले. मात्र आग्र्यावरुन सुटून आल्यानंतर शिवरायांनी 1670 साली पुन्हा सुरतेची लुट केली. 

शिवरायांनी दोनदा सुरतेची लुट केल्यामुळे सुरतेचे व्यापारी महत्त्व कमी झाले. इंग्रज व्यापाऱ्यांनी देखिल आपले लक्ष मुंबई बंदराकडे वळविले. 1662 पुर्वी मुंबई बंदर पौर्तुगीजांच्या ताब्यात होते. सन 1662 साली पौर्तुगालच्या राजकुमारीचा विवाह इंग्लंडच्या राजाशी झाला आणि पौर्तुगालच्या राजाने भेट म्हणून मुंबई बंदर इंग्लंडच्या राजाला दिले. शिवरायांनी 1664 साली पहिल्यांदा सुरत लुटली या लुटीत त्यांनी परदेशी व्यापाऱ्यांना जरी त्रास दिला नसला तरी इंग्रज व्यापाऱ्यांसाठी सुरत हे व्यापारी केंद्र सुरक्षित नव्हते. त्यामुळे इंग्रज व्यापाऱ्यांनी मुंबईवर लक्ष केंद्रीत केले. 

व्यापाऱ्यांना व्यापारात सवलती
मुंबईचा विकास सुरु केला. सन 1687 साली इंस्ट इंडिया कंपनीचे मुख्य कार्यालय इंग्रजांनी सुरतेहून मुंबईला स्थलांतरीत केले. इंग्रजांनी व्यापार दळणवळणासाठी व्यापाऱ्यांना मुंबईत येण्यास प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली. मुंबईत सुरक्षेसाठी सैन्य ठेवले, व्यापाऱ्यांना व्यापारात सवलती द्यायला सुरुवात केली. मुंबई हे एक सुरक्षित बंदर होते. मात्र दळणवळणासाठी तसे अवघडच, तरीही इंग्रजांनी मुंबई शहराचा विकास सुरु केला. जगभरातील अनेक देशांची व्यापारी जहाजे त्यानंतर मुंबई बंदरात यायला सुरुवात झाली. मुंबईतून मोठ्या प्रमाणात आयात-निर्यात त्यानंतर सुरू झाली. त्यानंतर मुंबईचा झपाट्याने विकास होत गेला. इंग्रजांनी सात डोंगरांचा समुह जोडून मुंबईचा विस्तार केला. व्यापार व ळणवळणासाठी रेल्वे सुरू केली.

मुंबईत शेअर बाजार सुरु झाला
पुढे अनेक व्यापारी, उद्योजक, मुंबईत स्थलांतरीत झाले. त्यांनी मोठे उद्योग मुंबईत सुरु केले. मुंबई हे कापसाच्या, कापडाच्या व्यापाराचे प्रमुख केंद्र बनले. अनेक कापड गिरण्या मुंबईत सुरू झाल्या. उद्योग व्यापाराच्या वाढीबरोबरच मुंबईत शेअर बाजार देखिल सुरु झाला सुरुवातीला काही व्यापाऱ्यांनी मिळून एका वडाच्या झाडाखाली शेअर बाजार सुरु झाला. कापसाच्या व्यापारात मोठा फायदा मिळत असल्याने अनेक व्यापाऱ्यांचे लक्ष मुंबईकडे वळाले होते. त्यातूनच 1875 साली मुंबईत पहिली नेटीव शेअर ऍन्ड स्टॉक असोसिएशन ही शेअर मार्केट मधील पहिली कंपनी सुरू झाली. पुढे शिक्षण, रोजगार, उद्योग, व्यापराचे मुंबई हे केंद्र झाले आज ही भारताची आर्थिक राजधानी ही मुंबईच आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Physics NEET Paper Leak Case : नीट फिजीक्सचा पेपर फोडणाऱ्या महिलेचे नाव समोर, सीबीआयची पुण्यात मोठी कारवाई; तीसरी पण 'मनिषा'च शोधली

America-Iran War: अमेरिका-इराण युद्ध केवळ पाच सेकंदात संपू शकतं; जागतिक वित्तीय संस्था 'जेफरीज'चा खळबळजनक दावा

Farmer loan waiver Maharashtra : शेतकरी कर्जमाफी आचारसंहितेत अडकणार का? पूर्वतयारी अंतिम टप्प्यात, चंद्रकांत पाटलांनी गुपीत फोडलं

Latest Marathi News Live Update : नीट पेपरफुटी प्रकरणात महिलेला अटक

Dog Bite Crisis: माळेगावात पिसाळलेल्या श्वानाचा हैदोस; सात नागरिक जखमी, दोन वृद्ध महिलांना नांदेडला हलविले

SCROLL FOR NEXT