मुंबई

एसटीच्या पासधारकांसाठी मोठी बातमी; परिवहन मंत्र्यांनी घेतला महत्वपुर्ण निर्णय

सकाळ वृत्तसेवा



मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने केलेल्या टाळेबंदीत एसटी महामंडळाची वाहतूक थांबवण्यात आली आहे. त्यामुळे मासिक, त्रैमासिक पास काढलेल्या; मात्र टाळेबंदीमुळे प्रवास करणे शक्य न झालेल्या प्रवाशांना सरकारने दिलासा दिला आहे. एसटी प्रवाशांना मासिक-त्रैमासिक पासमधील उरलेल्या दिवसांची मुदतवाढ अथवा उर्वरित रकमेचा परतावा देण्याची घोषणा परिवहन मंत्री अॅड्. अनिल परब यांनी मंगळवारी केली.

एसटी बसच्या मासिक-त्रैमासिक पासधारक प्रवाशांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. प्रवाशांना पासवरील उर्वरित दिवसांची मुदवाढ किंवा परतावा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पासधारकांनाच दोन पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. पासचा उपयोग नसल्यास परतावा घेता येईल किंवा आवश्यक असल्यास मुदतवाढीचा लाभ घेता येईल. त्यासाठी संबंधित प्रवाशांनी जवळच्या एसटी आगारात जाऊन आगार प्रमुखांच्या नावे अर्ज सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर त्यांना मासिक-त्रैमासिक पासला मुदतवाढ अथवा परतावा रक्कम देण्याची व्यवस्था करण्यात येईल, असे एसटी महामंडळातर्फे सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSMT: सीएसएमटी स्थानकात लोकल रुळावरुन घसरली; सलग दुसरी घटना घडल्यानं खळबळ

Shashi Tharoor T20 WC 2024 : माझा मतदारसंघ करणार वर्ल्डकपमध्ये प्रतिनिधित्व.... शशी थरूर भारतीय संघाची घोषणा होताच हे काय म्हणाले?

Poorest Politicians: भारतातील सर्वात गरीब 'पुढारी' कोण आहेत? ज्यांच्याकडे आहे फक्त 1,700 रुपयांची मालमत्ता

Latest Marathi News Live Update: अमेठी, रायबरेलीची जागा लवकरच जाहीर होणार; खर्गे घेणार पत्रकार परिषद

Rupali Ganguly: वेट्रेस म्हणून केलं काम, गाजवला छोटा पडदा अन् आता भाजपमध्ये प्रवेश; जाणून घ्या अनुपमा फेम रुपाली गांगुलींबद्दल

SCROLL FOR NEXT