vasai virar 
मुंबई

रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींच्या क्वारंटाईनबाबत वसई-विरार महापालिकेचा महत्वाचा निर्णय

सकाळवृत्तसेवा

वसई :  वसई-विरार शहर महापालिकेत कोरोनाबाधीतांची संख्या दररोज वाढत असून  सध्या पाचशेहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आता थेट संपर्कात येणाऱ्या रुग्णांना जर पुरेशी जागा असेल तर स्वतःच्या घरीच अलगीकरणात राहण्याची मुभा दिली जाणार असल्याचा निर्णय पालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागाने घेतला आहे.

सध्या वसई विरार पालिकेअंतगत कोरोना रुग्णांसाठी बोळींज येथे 20, कौलसिटी 45, वसई गाव 750, वालीव 65, नालासोपारा रिद्धीविनायक 75 खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. तर विरारच्या म्हाडा येथे देखील 370 जणांसाठी सुविधा देण्यात आल्या आहेत. परंतु रुग्णांची वाढती संख्या पाहता आरोग्य विभागाची सुविधा अपुरी पडण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेले व संशयित रुग्ण यांचे अलगीकरण हे घरातच करण्याचा निर्णय आयुक्त गंगाधरन डी. यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला आहे. हे रुग्ण नागरिकांच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घेत त्यांची आरोग्य विभागाकडून देखभाल देखील केली जाणार आहे. 

स्वघोषणापत्र बंधनकारक 
अलगीकरण घरीच करताना जो संशयित अथवा कोरोना रुग्णांच्या संपर्कात आला आहे. त्याच्याकडून आरोग्य विभागाने आखून दिलेल्या नियमाचे पालन कसे करावे याची माहिती दिली जाणार आहे व त्या व्यक्तीकडून अटींची पूर्तता केली जाईल असे  स्वघोषणापत्र देखील पालिकेकडून घेण्यात येणार आहे. 

घरात किती व्यक्ती राहतात, सुरक्षित अंतरासाठी किती जागा आहे.अलगीकरण करण्यासाठी घर योग्य आहे का? याची पाहणी देखील महापालिका प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. त्यानंतर त्या संशयित रुग्णाला परवानगी दिली जाणार आहे अन्यथा कोव्हिड केंद्रात त्याला हलविण्यात येईल. याबाबतचे निर्णय आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी घेणार आहेत. - रमेश मनाळे, अतिरिक्त आयुक्त, वसई विरार महापालिका.


Important decision of Vasai-Virar Municipal Corporation regarding quarantine of persons coming in contact with patients

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हो की नाही एवढंच बोला! मला बोलायचंय म्हणणाऱ्या वाल्मिक कराडला कोर्टानं फटकारलं; सुनावणीत काय घडलं?

Team India WTC Final Scenario: टीम इंडिया फायनलमध्ये जाणार की नाही? ICC ने सोपं गणित मांडून गुंता सोडवला की वाढवला?

Jalgaon Gold And Silver Price : खिसा रिकामा होणार! डिसेंबरच्या २१ दिवसांतच सोने ५५०० रुपयांनी तर चांदी २७ हजारांनी महागली

Viral Video: इथं कधीही फोटो काढू नका… क्षणात गिळंकृत करणारा पृथ्वीवरील जीवघेणा स्पॉट, इथं उभं राहणंही धोकादायक

Maharashtra’s Traditional Jewelry: महाराष्ट्रातील पारंपरिक दागिने तुम्हाला माहिती आहे का?

SCROLL FOR NEXT