duddu.jpg 
मुंबई

'आहे ती परिस्थिती स्वीकारण मला'...उद्धव ठाकरेंच्या संबोधनातील १० महत्त्वाचे मुद्दे

दीनानाथ परब

 राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी काही महत्त्वाची विधाने केली. भविष्यातील दिशा कशी असेल, त्याचे संकेत त्यांनी दिले. 

- घाबरुन जाऊ नका, मला अनेकांचे फोन आले. मी घाबरवण्यासाठी आलेलो नाही. मार्ग काढण्यासाठी मी आपल्याशी संवाद साधतोय. वर्षभरापासून आपण एका विचित्र विषाणू बरोबर लढतोय. मागच्यावर्षी मार्चच्या महिन्यात कोविड विषाणूने महाराष्ट्रात शिरकाव केला. 

- विषाणू वेगवेगळे अवतार धारण करुन संकटात टाकतोय, परिक्षा बघतोय. सुरुवातीला कोरोनाच्या कस्तुरबा आणि पुण्यात NIV मध्ये कोरोनाच्या चाचण्या व्हायच्या. आज कोरोनाच्या चाचण्या करणाऱ्या ५०० लॅबस उभ्या केल्यात.

- मुंबईत दरदिवशी ५० हजार चाचण्या करतोय. महाराष्ट्राची क्षमता ७५ हजार चाचण्या करण्याची होती, आता १ लाख ८२ आहे. लवकरच २.५० लाखापर्यंत क्षमता करण्याचा प्रयत्न 

- महाराष्ट्रातील परिस्थिती धक्कादायक वाटत असली, तरी सत्य लोकांसमोर ठेवतोय. मला खलनायक ठरवलं तरी मी माझी जबाबदारी पार पडणार. दुसऱ्या राज्यांबद्दल बोलणार नाही. 

- आयसोलेशन बेडसची संख्या २ लाख २० हजार आहे. त्यात ६२ टक्के बेडस भरले गेले आहेत. ऑक्सिजनचे बेडस ६२ हजारच्या आसपास आहेत, ते २५ टक्के भरले आहेत. 
परिस्थिती चिंताजनक आहे. परिस्थिती अशीच राहिली तर १५-२० दिवसात सुविधा अपुऱ्या पडतील. 

- कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत चालला आहे. परिस्थिती अशीच राहिली तर सुविधा अपुऱ्या पडतील. सुविधा वाढवण्याचे आदेश दिले आहेत.  साधने वाढली तरी मनुष्यबळ कुठून आणणार असा प्रश्न आहे. याचीच चिंता मोठी आहे. 

- एका उद्योगपतीने आरोग्य सुविधा वाढवण्याचा सल्ला दिला. ऑक्सिजन, बेडस वाढवता येतील. पण त्यांनी ५० डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारीही उपलब्ध करुन द्यावेत, 
आता पाऊस नाही, वादळ आहे, लस घ्या ती सध्या एक छत्री आहे. लस घेणं, चाचण्या वाढवण हा उपाय मला वाटत नाही. रुग्ण वाढ रोखण्यासाठी कोणी उपाय सुचवत नाही.
पुढच्या १५-२० दिवसात हॉस्पिटल्स तुडूंब भरतील. ऑक्सिजनही कमी पडू शकतो.  स्वयंशिस्तीने कोरोनाची दुसरी लाट रोखू शकतो, कोरोनाला मी मात करुन देणार नाही, आपल्यालाच कोरोनावर मात करायची आहे. 

- जनतेच्या जीवाशी खेळू नका, विरोधीपक्षांना माझं आवाहन आहे. तुम्ही रस्त्यावर उतरण्याचे इशारे देत आहेत. जरुर तुम्ही रस्त्यावर उतरा पण लॉकडाउन विरोधात नाही, तर लॉकडाउन रोखण्यासाठी उतरा. डॉक्टरांना मदत करण्यासाठी उतरा. ज्या घरातला कर्ता पुरुष गेलाय, त्या कुटुंबाच्या मदतीसाठी उतरा. 

- पूर्ण लॉकडाउनचा इशारा देतोय. पण आज लॉकडाउन जाहीर करत नाहीय. एकदोन दिवसात दुश्य स्वरुपात बदल दिसले नाहीत. माझ्या काही बैठका होणार आहेत, दुसरा उपाय आढळला नाही तर आहे ती परिस्थिती स्वीकारण मला जमणार नाही. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''माझा भाऊ...'' मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया

मासिक पाळी आली की गाव सोडावं लागतं, प्रसूतीनंतरही २१ दिवस वनवास; आंध्र प्रदेशातील धक्कादायक प्रथा...

MSRTC Udgir Chaos: उदगीरच्या ४९ एसटी बसेस कोकणात; स्थानिक वाहतुकीचे तीनतेरा, प्रवाशांना बसस्थानकावर ताटकळावे लागले

Leopard Terror: मांजरी खुर्दमध्ये बिबट्याचा कहर; गोठ्यात घुसून वासराचा फडशा, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

National Unity Day : गुजरातमध्ये पार पडणार राष्ट्रीय एकता दिन ; संजीवनीचे बॅण्ड पथक देणार पंतप्रधान मोदींना सलामी

SCROLL FOR NEXT