Mumbai Sakal
मुंबई

कळंबोली पोलिसांनी केली आठ महिन्यात ५२ लाखा पेक्षा जास्तच्या दंडाची आकारणी

कळंबोली पोलीस ठाण्याच्या वतीने महामार्गावरील वाहन चालकनविरोधात धडक मोहीम

दीपक घरत

पनवेल : शिव (Sion) - पनवेल (Panvel) महामार्गावरील कळंबोली मक्डोनाल्ड या ठिकाणी प्रवासी वाहतूक अथवा इतर करणा साठी थांबणाऱ्या वाहन चालका विरोधात कारवाई करत कळंबोली(Kalamboli) पोलिसांनी (Police) मागील आठ महिन्यात १२ हजार १४३ केसेस दाखल करून ५२ लाखा पेक्षा जास्तची दंड आकारणी केली असल्याची माहिती पोलीस ठाण्याच्या वतीने देण्यात आली आहे.

मुंबई - नवी मुंबई मधून राज्यातील इतर भागात जाण्यासाठी वापरात असलेल्या मुबंई - पुणे द्रुतगती महामार्गाची सुरवात शिव - पनवेल महामार्गावरील कळंबोली मॅक्डोनाल्ड या ठिकाणावरून होत असल्याने या ठिकाणी प्रवासी वाहतूक करणारी वाहाणे तसेच इतर वाहनांची मोठी वर्दळ असते.शनिवार, रविवार तसेच सुट्टीच्या दिवशी वाहनाच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याने वाहतूक कोंडी होऊन अनेकदा लहान मोठे आपघात घडत असल्याने या वाहने उभी करण्यास तसेच खाजगी वाहनाना प्रवासी घेण्यास मनाई असताना देखील अनेक वाहन चालक प्रवाशी घेण्यासाठी अथवा इतर कारणासाठी आपली वाहन रस्त्यावर उभी करत असल्याने वाहतूक विभागा कडून आशा वाहन चालका विरोधात नेहमीच कारवाई करण्यात येत असते.

स्थानिक वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबतच कळंबोली पोलीस ठाण्याने देखील कळंबोली मॅक्डोनाल्ड येथे प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेत प्रवाशांच्या सुरक्षिततेचि काळजी घेण्यासाठी या ठिकाणी सुरक्षा चौकी उभारत पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक केली असून,वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालका विरोधात ऑनलाईन कारवाई करण्याचे अधिकार कर्मचार्यांना दिले असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीने मागील आठ महिन्यात करण्यात आलेल्या १२ हजार १४३ केसेस द्वारे ५२ लाख ३२ हजार ६०० रुपये दंडाची आकारणी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT