Raj Thackeray esakal
मुंबई

Raj Thackeray राजकीय खिचडीत, युवकांची राज ठाकरेंना पसंती; दिव्यात तरुणांचा 'मनसे'त प्रवेश

शर्मिला वाळूंज

डोंबिवली - राज्यात राजकीय पक्षातील नेत्यांची धरसोड वृत्ती सुरू आहे. या राजकीय घडामोडींमुळे विकास कामासाठी कोणत्या नेत्यांचा आदर्श घेत पक्षाची वाट धरावी असा प्रश्न स्थानिक कार्यकर्त्यांना पडला आहे. असे असताना दिव्यातील तरुणांनी मनसे पक्षाला पसंती देत आमदार राजू पाटील यांच्या उपस्थितीत मनसे पक्षात प्रवेश केला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांच्या उपस्थितीत बुधवारी दिवा येथे जनता संपर्क कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक तरुण कार्यकर्त्यांनी मनसे पक्षात प्रवेश केला. राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडी लक्षात घेता तारुणांनी योग्य पर्याय निवडला असल्याचे आमदार राजू पाटील यांनी सांगितले.

दिव्यात मजबूत असलेल्या मनसे पक्षात आता आणखी शेकडो तरुणांची आतिरिक्त फ़ौज दाखल झाल्याने मनसे पक्ष आणखी मजबूत होणार आहे. या सर्व पक्ष प्रवेश केलेल्या तरुणांच्या लवकरच पद नियुक्त्या आणि त्यांच्यासाठी मार्गदर्शन शिबीर आयोजित केलं जाणार असल्याचे आमदारांनी सांगितले.

यावेळी मनसेचे उप जिल्हा अध्यक्ष योगेश पाटील,कल्याण ग्रामीण विधानसभा सचिव अरुण जांभळे,दिवा शहर अध्यक्ष तुषार पाटील यांसह सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

राज्यातील शिवसेना, भाजपा व राष्ट्रवादी या पक्षातील राजकीय घडामोडी पाहता आता नेमके करायचे काय असा प्रश्न स्थानिक कार्यकर्त्यांसह सामान्य नागरिकांना पडला आहे. या पक्षातील राजकारण पाहता दिव्यातील तरुण वर्गाने वेगळी वाट निवडत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पाठींबा दिल्याचे पहायला मिळत आहे.

पक्ष प्रवेश केलेल्या या तरुण वर्गाला कोणताही राजकीय वारसा नाही. तसेच राज्यातील राजकारणाला कंटाळून आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे विचार पटत असल्याने पक्ष प्रवेश करत आहोत असे तरुणांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT