Mumbai Sakal
मुंबई

ठाण्यात 'सरकारी बाबूं'ना दणका

प्रभाग समितीत वर्षानुवर्षे तळ ठोकून बसलेल्या १७० कर्मचाऱ्यांच्या बदल्या

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : महापालिका (municipal) क्षेत्रात गेल्या दोन महिन्यांपासून अनधिकृत बांधकामांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर महापालिका प्रशासनावर करण्यात येत असललेल्या टीकेची दखल घेत महापालिकेच्या सहायक आयुक्तांना नोटिसाही बजाविण्यात आल्या आहेत. त्यापाठोपाठ आता प्रभाग समितीत वर्षानुवर्षे तळ ठोकून बसलेल्या १७० कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.

यामध्ये सर्वाधिक अतिक्रमण विभागात कार्यरत ८५ कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोनादरम्यान उभ्या राहिलेल्या अनधिकृत बांधकामांवरून विरोधकांनी रान उठविले होते. त्यात स्थायी समितीच्या बैठका असो अथवा सर्वसाधारण सभा या दोन्ही सभागृहांत सदस्यांकडून हा मुद्दा चर्चिला जात होता. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

ठाणे महापालिकेच्या विविध नक प्रभाग समित्यांतील १७० कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये अतिक्रमण विभागात कार्यरत तब्बल ८५ कर्मचाऱ्यांच्याच म्हणजेच १०० टक्के बदल्या केल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे. नागरिकांसह राजकीय पक्षांकडून मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामांच्या मुद्द्यावरून या बदल्या केल्याची माहिती महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणूक; काँग्रेस-भाजपाकडून उमेदवारांची नावं निश्चित? राजकीय पक्षांच्या गोटात नेमकं काय चाललंय?

Viral Video : भाई, कॅप्टनला थोडातरी आदर दे! क्विंटन डी कॉक live Match मध्ये टेम्बा बवुमावर चिडला, सहकारी यष्टिरक्षकाला आवरताना दिसले

Ladki Bahin Yojana August Installment : लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली! आजपासून बँक खात्यात जमा होणार 'ऑगस्ट'चे 1500 रुपये; लगेच चेक करा खाते

Mumbai Local: विरार लोकलमध्ये काका तर्राट! दरवाजात उभं राहून बिअर प्यायले अन्...; Video Viral

Latest Marathi News Live Update : ‘सीओईपी’च्या चिखली कॅम्पसमध्ये उभाणार ‘स्वदेशी बॅटरी तंत्रज्ञान केंद्र’

SCROLL FOR NEXT