File photo
मुंबई

तिसऱ्या लाटेचा मुंबईत 'या' ठिकाणी राहणाऱ्या लोकांना धोका

कशी असणार आहे तयारी?

दीनानाथ परब

मुंबई: कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच, तिसऱ्या लाटेचा धोका (third covid wave) वर्तवला जात आहे. तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसू शकतो असा अंदाज आहे. लहान मुलांबरोबरच झोपडपट्टीत (Slum dwellers) राहणाऱ्या लोकांना तिसऱ्या लाटेमध्ये कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग होण्याची भीती आहे. याच दोन शक्यता ध्यानात घेऊन महापालिका बालरोगतज्ज्ञांना विशेष प्रशिक्षण देणार आहे, तसेच झोपडपट्ट्यांमध्ये सार्वजनिक शौचालय आणि अन्य सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवण्यावर भर दिला जाणार आहे. (In third covid wave Slum dwellers in Mumbai at risk)

"पहिल्या लाटेचा झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकसंख्येवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला. दुसऱ्या लाटेत बहुमजली टॉवर आणि युवकांना कोरोनाची बाधा होण्याचे प्रमाण जास्त होते" असे महापालिका अधिकाऱ्याने सांगितले. महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी अधिकाऱ्यांना तिसऱ्या लाटेसाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. अतिरिक्त आयुक्त सुरेश काकानी यांनी सर्व २४ वॉर्डांना बालरोग तज्ज्ञांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. मिड डे ने हे वृत्त दिले आहे.

तिसऱ्या लाटेत लहान मुलांना बाधा होऊ शकते, म्हणून खास बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे. हा टास्क फोर्स बालरोग तज्ज्ञांना मार्गदर्शन करेल. वैद्यकीय शिक्षण संचालक रमेश भारमल यांच्यावर नियोजनाची जबाबदारी आहे. "समोरासमोर दिलेलं प्रशिक्षण जास्त प्रभावी ठरतं हे आढळून आलय. आमचे टास्क फोर्सचे सदस्य आणि वॉर्ड वॉर रुममधील डॉक्टर्स संवाद साधतील. प्रशिक्षणासाठी आम्ही मॉड्युल तयार करत आहोत" असे डॉ. भारमल यांनी सांगितले.

"सर्व वॉर्ड अधिकाऱ्यांना कृती आराखडा तयार करुन कार्यकारी आरोग्य अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करायला सांगितला आहे. बालरोग तज्ज्ञांचे प्रशिक्षण लवकरात लवकर सुरु होईल" असे काकानी म्हणाले. या वर्षी मार्च महिन्यात तिसरा सिरो-सर्व्हे करण्यात आला. त्यात बिगर झोपडपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांमध्ये अँटि SARS-CoV-2 सिरोपॉझिटिव्हिटी म्हणजे अँटीबॉडीचे प्रमाण वाढल्याचे आढळून आले, तर झोपडपट्ट्यांमध्ये अँटिबॉडीजचे प्रमाण कमी दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

Mumbai : आमचं नातं शरीर संबंधाच्या पलिकडचं, आजही...; विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेचा खळबळजनक दावा

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

SCROLL FOR NEXT