नवी मुंबईतील ‘...या’ प्रकल्पांचे उद्‌घाटन लवकरच! 
मुंबई

नवी मुंबईतील ‘...या’ प्रकल्पांचे उद्‌घाटन लवकरच!

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : महापालिकेच्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सत्ताधाऱ्यांनी शहरातील रखडलेल्या प्रकल्पांच्या उद्‌घाटनांना हिरवा कंदील दर्शवला आहे. वाशी येथे कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात येत असलेल्या वाणिज्य संकुलाच्या कामाचे १४ डिसेंबरला भूमिपूजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने वाशीतील अग्निशमन केंद्राची इमारत, शिरवणे सेक्‍टर १ येथील बहुउद्देशीय मार्केट, सानपाडा येथील अण्णाभाऊ साठे समाजमंदिर आणि सेन्सरी गार्डनच्या उद्‌घाटनांनाही महापौर जयवंत सुतार यांनी हिरवा कंदील दर्शवला आहे. 

महापालिकेतर्फे तयार करण्यात आलेल्या विविध प्रकल्पांचे श्रेय घेण्याच्या सत्ताधाऱ्यांच्या प्रयत्नामुळे गेल्या सहा महिन्यांपासून तब्बल १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून तयार केलेल्या आठ प्रकल्पांपेक्षा जास्त प्रकल्प खितपत पडून आहेत. घणसोली येथे महापालिकेने सुमारे १५ कोटी रुपये खर्च करून तयार केलेल्या सेंट्रल पार्कची उद्‌घाटनाअभावी दुरवस्था होऊ नये म्हणून उद्यानाच्या देखभाल-दुरुस्तीचे कंत्राट आणण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली आहे. विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून या प्रकल्पांच्या उद्‌घाटनाची रचना असल्यामुळे ग्रंथालय, बहुउद्देशीय इमारत, उद्याने, अपंगांसाठी तयार केलेले सेन्सरी गार्डन आदी महत्त्वाच्या सुविधांपासून नागरिकांना वंचित राहावे लागले होते. महापालिका प्रशासनाने लोकसभा निवडणुकांपूर्वीच घणसोली सावली गाव येथील सेंट्रल पार्क तयार केले आहे. पंचमहातत्त्वांवर आधारित सर्व सुविधांनी सज्ज असे उद्यान तयार होऊनही या उद्यानांचा नागरिकांना लाभ घेता येत नाही. 

मोबाईल नंबर पोर्ट करायचाय? आता ‘हे’ आहेत नियम...

ऐरोली सेक्‍टर ५ येथे गोरगरीब मुलांसाठी तयार केलेली ग्रंथालयाची इमारतही तयार झाली आहे. ही इमारत उद्‌घाटन केल्यास या ठिकाणी अभ्यासिका वर्ग सुरू करता येणार आहेत; मात्र उद्‌घाटन न झाल्यामुळे अनेक होतकरू विद्यार्थी दर्जेदार सुविधेपासून दूर राहिले आहेत. ऐरोली सेक्‍टर १७ व शिरवणे सेक्‍टर १ येथे तयार झालेल्या बहुउद्देशीय इमारतींचे कामही अभियांत्रिकी विभागाने काही महिन्यांपूर्वीच पूर्ण केले आहे, परंतु त्याला अद्याप सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी उद्‌घाटनासाठी हिरवा कंदील प्रशासनाला दाखवलेला नसल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सानपाड्यात शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने तयार केलेले समाजमंदिर उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. शहरातील अपंगांकरिता विशेष प्रशिक्षण केंद्र सुरू करणारी राज्यातील पहिली महापालिका म्हणून लौकिक असलेल्या महापालिकेने अपंगांसाठी तयार केलेले सेन्सरी गार्डन सुरू करण्याचा विसर प्रशासनाला पडला आहे. 

महापौरांचा पाहणी दौरा 
शहरातील विकास कामांचे उद्‌घाटन करण्याचे योजिले असल्यामुळे महापौर जयवंत सुतार यांनी बुधवारी (ता.११) शहरातील विकासकामांचा पाहणी दौरा केला. शहर अभियंते सुरेंद्र पाटील यांना सोबत घेऊन विकासकामे पूर्ण झालेल्या प्रकल्पांना सुतार यांनी भेट देऊन पाहणी केली. काही ठिकाणची किरकोळ कामे पूर्ण करण्याच्या सूचना सुतार यांनी प्रशासनाला देत विकासकामांच्या उद्‌घाटनांना हिरवा कंदील दर्शवला. 

प्रशासनाने तयार केलेल्या प्रकल्पांच्या कामांची पाहणी करण्यासाठी दौरा केला. हे सर्व प्रकल्प पूर्ण झाले असल्यामुळे त्यांचे उद्‌घाटन लवकरच करण्यात येणार आहे. १४ डिसेंबरला वाशी वाणिज्य संकुलाचे भूमिपूजन करण्यात येईल. त्यानंतर इतर प्रकल्पांचे लवकरच उद्‌घाटन होणार आहे. 
- जयवंत सुतार, महापौर, नवी मुंबई. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate latest News : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होणार ; राजीनामा अजित पवारांनी स्वीकारला

Latest Marathi News Live Update : केडीएमसीच्या निवडणुकीसाठी नऊ ठिकाणी मतमोजणी

Ishan Kishan : १० षटकार, ६ चौकार! इशान किशनचे वादळी शतक; अभिषेक शर्माच्या विक्रमाशी बरोबरी, पूर्ण केल्या ५०० धावा

31 Dec Deadline alert : ३१ डिसेंबर शेवटची संधी!, बँक अन् ‘आधार’शी संबंधित 'ही' महत्त्वाची कामे केली नाहीत, तर पडेल महागात!

'एक दो तीन' गाण्यावेळी माधुरी दीक्षितसोबत नक्की काय घडलं? की, सरोज खान वैतागून म्हणाल्या...'तू घरी जा...'

SCROLL FOR NEXT