Income Tax Notice To BMC Commissioner e sakal
मुंबई

मुंबई महापालिका आयुक्तांना आयकर विभागाची नोटीस

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुंबईचे पोलिस आयुक्त इकबालसिंह चहल (BMC Commissioner Ikbal Singh Chahal) यांना आयकर विभागाची (Income Tax) नोटीस आली आहे. यशवंत जाधव यांच्यावरील कारवाई प्रकरणी ही नोटीस आल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी यशवंत जाधव यांच्यावर आयकर विभागानं कारवाई केली होती. याबाबत चहल यांची चौकशी होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

गेल्या १० मार्च २०२२ ला इकबाल सिंह चहल यांना आयकर विभागाच्या कार्यालयात काही कागदपत्रांसह बोलावलं होतं. एप्रिल २०१८ ते मार्च २०२२ पर्यंत मुंबई महापालिकेतील स्थायी समितीने मंजूर केलेले कंत्राट, बैठकीचा आढावा आणि कंत्राटदारांची माहिती हे सर्व कागदपत्र घेऊन त्यांना बोलावलं होतं. त्याला चहल यांनी उत्तर दिलं होतं, अशी सूत्रांची माहिती आहे. आता याप्रकरणी पुन्हा त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. आयकर विभागाची महापालिकेतील कामांवर नजर असून त्यासाठी ही नोटीस देण्यात आली आहे. यशवंत जाधव स्थायी समितीचे अध्यक्ष असताना मंजूर झालेल्या कंत्राटामध्ये घोटाळा झाल्याचा संशय आयकर विभागाला आहे. त्यामुळेच ही सर्व माहिती गोळा करण्याचं काम सुरू आहे.

मुंबई महापालिका आयुक्तांना आलेली नोटीस

काही दिवसांपूर्वी आयकर विभागाने मुंबई महापालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर छापेमारी केली होती. त्यांच्या घरातून काही मालमत्ता देखील जप्त करण्यात आली होती. यशवंत जाधव स्थायी समितीचे अध्यक्ष असताना त्यानी कंत्राटामध्ये कोट्यवधीचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. यशवंत जाधव यांनी चार कंत्राटदारांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची संपत्ती आपल्या नावावर केल्याचा आरोप आहे. ही बेनामी संपत्ती असल्याचा आयकर विभागाचा दावा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

Dattatraya Meghe Passes Away: लोकसेवेचा वटवृक्ष निमाला! माजी खासदार, लोकनेते दत्ता मेघे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, विविध क्षेत्रात हाेता दबदबा..

SCROLL FOR NEXT