क्रीडा संकुलाची झालेली दुरवस्था
क्रीडा संकुलाची झालेली दुरवस्था 
मुंबई

विद्यापीठाच्या क्रीडा संकुलाची दुरवस्था!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : काही दिवसांपूर्वीच मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्राची दुरवस्था झाल्याची बाब उघड झाली होती. त्यानंतर आता मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलाचे विदारक चित्र समोर आले आहे. क्रीडा संकुलाच्या बास्केट बॉल कोर्टची प्रचंड दुरवस्था झाली असून कबड्डीचे मॅटही कचऱ्यात पडले आहेत; तरीही सरावासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांकडून विद्यापीठातर्फे दर तीन महिन्यांनी पाच हजार २०० रुपये न चुकता वसूल केले जात आहे.

भरमसाट शुल्क आणि त्या तुलनेत मिळणाऱ्या अपुऱ्या सुविधा यामुळे लांब उडीच्या सरावासाठी येणाऱ्या १० पैकी आठ विद्यार्थ्यांनी सरावाला येणे बंद केले आहे. मरीन लाईन्समधील क्रीडा संकुलातील शुल्क आणि जाहिरातीतून विद्यापीठाला दर वर्षी कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळते. विद्यापीठाच्या संलग्न महाविद्यालयातून तरुण खेळाडू सरावासाठी येतात; मात्र त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या कूलरचीही सोय नाही. 

विद्यार्थ्यांची कामगिरी उत्कृष्ट झाल्यास राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्यापीठाचेच नाव मोठे होणार आहे. त्यामुळे क्रीडा संकुलात विद्यार्थ्यांना विनाशुल्क सराव करण्यास मुभा द्यावी, अशी मागणी युवासेना सिनेट सदस्यांनी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव विनोद पाटील यांच्याकडे केली आहे.

उत्पन्न मिळते तरी देखरेखीकडे दुर्लक्ष
क्रीडा संकुलातील कूलर अनेक दिवसांपासून बंद असल्याने विद्यार्थ्यांना पिण्यासाठी बाटलीबंद पाणी विकत घेऊन सरावासाठी यावे लागत आहे. संकुलात फक्त दोनच हॅलोजन असल्याने पुरेशी प्रकाशव्यवस्था नाही. त्यातच मीटर बॉक्‍समध्ये पाणीगळती होत असल्याने शॉर्ट सर्किट होऊन आग लागण्याची शक्‍यता आहे. प्रवेशद्वार तुटलेले आहे. संकुलाला वर्षाला ३५ लाख भाडे मिळते. क्रीडा संकुलाला मोठ्या प्रमाणात उत्पन्न असताना विद्यार्थ्यांकडून भरमसाट शुल्क का वसूल करण्यात येते, असा प्रश्‍न युवा सेनेचे सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी उपस्थित केला.

लवकरात लवकर क्रीडा संकुलाचे संचालक व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येईल. संकुल सुसज्ज करण्याचे आदेश देण्यात येतील. 
- विनोद पाटील, प्रभारी कुलसचिव, मुंबई विद्यापीठ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT