Indefinite hunger strike of State ST Workers Organization 8 percent da allowance Sakal
मुंबई

Mumbai News : राज्य एसटी कामगार संघटनेचे बेमुदत उपोषण आंदोलन कायम

उद्योग मंत्र्यांच्या पहिल्या बैठकीत तोडगा निघालाच नाही

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांना एकूण ८ टक्के महागाई भत्ता वाढ द्यावी, त्याशिवाय इतर आर्थिक प्रलंबित मागण्या राज्य सरकारने तातडीने मंजूर करून कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा यासाठी राज्य एसटी कामगार संघटना ११ सप्टेंबर रोजी आझाद मैदानावर बेमुदत आमरण उपोषण सुरू केलं आहे.

पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांच्या वतीने उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एसटी कामगारांच्या मागण्या ऐकून घेतल्या असून, त्यावर दिवसभरात मात्र कोणताही तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे बेमुदत आमरण उपोषण कायम असल्याचे संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सांगितले.

बैठकीत सामंत यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या सोबत झालेल्या बैठकीतील चर्चा मुख्यमंत्र्यांसमोर ठेवण्यात येऊन,त्यानंतर पुन्हा मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीचे आयोजन केले जाणार असल्याचे सांगितले मात्र, वृत्त लिहेपर्यंत मुख्यमंत्री कार्यालयाकडून आंदोलकांना बैठकीचा कोणताही निरोप आला नसल्याचे सांगण्यात आले.

मात्र, आंदोलकांच्या प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास १३ सप्टेंबर पासून जिल्हा पातळीवर सुद्धा एसटी कर्मचारी आंदोलनात सहभागी होऊन बेमुदत आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा सुद्धा शिंदे यांनी दिला आहे.

काय आहे मागण्या

  • शासकीय कर्मचा-यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना ४२ टक्के महागई भत्ता द्यावा

  • महागाई भत्याची वर्ष २०१८ पासूनची थकबाकीही देण्यात यावी.

  • वर्ष २०१६-२०२० च्या कामगार करारातील १२०० कोटीपेक्षा जास्त थकबाकी कामगारांना त्वरीत द्यावी

  • २०१६-२०२० च्या एकतर्फी वेतनवाढीतील शिल्लक रक्कमेचे वाटप कामगारांच्या मूळ वेतनामध्ये करावे

  • मूळ वेतनात जाहिर केलेले ५,०००, ४,००० आणि २,५०० या रक्कमेमुळे अनेक सेवाजेष्ठ कर्मचा-यांच्या वेतनातील त्रुटी दूर करावी

  • काही महामंडळास व संस्थांच्या धर्तीवर एसटी महामंडळाला ही ७ वा वेतन आयोग लागू करावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT