India Aghadi march in Mumbai today to protest BJP policies vijay wadettiwar Thackeray Faction Politics  
मुंबई

India Alliance : भाजप विरोधात 'इंडिया आघाडी'चा आज मुंबईत मोर्चा! वडेट्टीवारांच्या आरोपानंतर ठाकरे गट नाराज?

आज इंडिया आघाडीकडून भाजपच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे.

रोहित कणसे

आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमिवर देशातील राजकीय पक्षांकडून हलचालींनी वेग आला आहे. विरोधकांची इंडिया आघाडीकडून पीएम मोदी आणि भाजपविरोधात मोर्चेबांधणी केली जात आहे. यादम्यान आज (२ ऑक्टोबर) इंडिया आघाडीकडून भाजपच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. मुंबईतील या मोर्चामध्ये ठाकरे गट सहभागी होणार की नाही याबाबत मात्र अस्पष्टता आहे.

काँग्रेस-ठाकरे गटात बिनसलं?

दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेला ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्यांनी दांडी मारली होती. तसेच विधानसभेचे विरोधी पक्षनेते, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्याबाबत एक मोठं विधान केलं होतं.

वडेट्टीवार यांनी अंबादास दानवे मराठा आहेत मात्र त्यांच्याकडे ओबीसी जात प्रमाणपत्र असल्याचे वडेट्टीवार म्हणाले होते. त्यामुळे काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना या दोन्ही पक्षात विसंवाद असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. तसेच विजय वडेट्टीवार यांच्या आरोपाने ठाकरे गट नाराज असल्याच्या चर्चा देखील आहेत. त्यामुळे आजच्या मोर्चात शिवसेना सहभागी होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नेमकं काय झालं?

काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी उद्धव ठाकरे गटातील नेते आणि विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे मराठा असून देखील त्यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचे आरोप पत्रकार परिषदेत केला होता. यानंतर दानवे यांनी स्पष्टीकरण देत त्यांच्याकडे ओबीसी जात प्रमाणपत्र नसल्याचे सांगितले. तसेच त्यांनी वडेट्टीवारांना पुरावा देण्याची मागणी करत हा आरोप फेटाळून लावला आहे.

मागील काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी समाज आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक झाले आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाकडून आंदोलने होत आहेत. तर ओबीसी समाज मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचा विरोध करत आहे. यादरम्यान वडेट्टीवार यांनी आरोप केला आहे की मराठवाड्यातील जवळपास २८ लाख लोकांनी पैसे देऊन ओबीसी जात प्रमाणपत्र मिळवलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकड्यांना आलीय मस्ती... IPL 2026 ची तारीख जाहीर होताच, Mohsin Naqvi ने खेळला घाणेरडा डाव; भारतीयांच्या डोक्यात तिडीक गेली

U19 Asia Cup: १७ चौकार, ९ षटकार अन् डबल सेंच्युरी! भारताच्या अभिज्ञान कुंडूने रचला इतिहास, कोणालाच न जमलेला केला पराक्रम

मालिकेत मीरा परत आली तरी प्रेक्षक अभिनेत्रीवर नाराज; भलतंच कारण आलं समोर

Latest Marathi News Live Update : लातूर तालुक्यात डोंगर पोखरून जमिनीची चाळण; तहसीलदारांचे दुर्लक्ष, मंत्री बावनकुळे आज लातूर दौऱ्यावर, कारवाई होणार का?

IPL 2026 Auction live : लिलावापूर्वी BCCI ची 'गुगली'! परदेशी खेळाडूंसाठी निश्चित केली Salary Cap; जाणून घ्या बदललेला नियम

SCROLL FOR NEXT