मुंबई

भारत करणार 'या' सर्वात शक्तिशाली न्यूक्लियर मिसाईलची चाचणी

सकाळ वृत्तसेवा

भारताकडून आणखी एका न्यूक्लियर मिसाईलचं सर्वेक्षण केलं जाणार आहे. डिफेंस रिसर्च एंड डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन (DRDO) नोव्हेंबरला आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम किनार्यावरून ही चाचणी करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाण्याखालील एका प्लॅटफॉर्मवरून हे लॉन्चिंग केलं जाणार आहे. 

ANI या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार ज्या न्यूक्लियर मिसाईलची भारत चाचणी करणार आहे त्याचं नाव K4 असं असल्याचं समजतंय. हे न्यूक्लियर मिसाईल 3500 किमी पर्यंत अचूक निशाणा साधू शकतं. हे देशातील दुसरं अंडरवॉटर मिसाईल आहे.  

या आधी B0-5 या न्यूक्लियर मिसाईलची चाचणी भारताने केली होती. ही चाचणी सफल ठरली होती. B0-5 या न्यूक्लियर मिसाईलची मारक क्षमता 700 किमीपेक्षा जास्त होती. दरम्यान, K 4 च्या टेस्टिंगनंतर हेच  भारताच्या भात्यातील सर्वात शक्तिशाली अंडर वॉटर मिसाईल असेल यात शंका नाही.   

डिफेंस रिसर्च एंड डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन (डीआरडीओ) ने या आधी B0-5 या 700 किमी मारक-क्षमता असलेल्या मिसाईलची चाचणी केली होती. DRDO सूत्रांच्या माहितीनुसार  K 4 ची चाचणी मागच्या महिन्यातच केली जाणार होती. मात्र, काही कारणांमुळे ते पुढे ढकलण्यात आलं. 

अमेरिका, ब्रिटन, फ्रांस, रशिया आणि चीन नंतर भारत अशा मिसाईलची चाचणी करणारा भारत हा सहावा देश ठरणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार INS अरिहंत वरून हे न्यूक्लियर मिसाईल डागण्यात येणार आहे. दरम्यान, असंही सांगितलं जातंय की येत्या काही आठवड्यांमध्ये अग्नि-3 आणि ब्रह्मोस मिसाईलची देखील चाचणी करण्यात येणार आहे.

WebTitle :  india will test most powerful nuclear missile in bengaluru

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IIT Bombay Student Tragedy : चॅटजीपीटीवरून कॉपी करताना पकडला, पवई आयआयटीच्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन

Ajit Agarkar : "मलाच या पदावर आता राहायचे नाही, तुम्ही नवीन अध्यक्ष शोधा..."; अजित आगरकरचं पत्र, BCCI कडूनही उत्तर; फुल ड्रामा

Latest Marathi News Update : अखेर भुलेश्वर राजाची मुर्ती पुन्हा विराजमान, कार्यकर्त्यांच्या डोळ्यात पाणी

श्रीदेवींच्या निधनानंतर त्यांची २५० कोटींची संपत्ती कुणाला मिळाली? मृत्यूनंतरही वर्षाला मिळणारे १३ कोटी कुणाच्या खात्यात जातात?

Monsoon Returns in Marathwada : मराठवाड्यात चार दिवस परतीचा पाऊस रविवारपासून हजेरी, ज्येष्ठ हवामान तज्ज्ञांकडून अंदाज व्यक्त

SCROLL FOR NEXT