मुंबई

अरबी समुद्रात 3 हजार कोटींचे ड्रग्ज तटरक्षक दलाकडून जप्त

कृष्ण जोशी

मुंबई: भारतीय तटरक्षक दलाने लक्षद्वीप मिनिकॉय बेटांजवळ मोठी कारवाई करत 300 किलो हेरॉईन जप्त केले. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत सुमारे 3 हजार कोटी रुपये आहे. काही परदेशी मच्छिमार बोटी अंमली पदार्थांची तस्करी करत असल्याची माहिती मिळाल्यावरून तटरक्षक दलाने 15 मार्चपासून अरबी समुद्रात व्यापक शोधमोहीम चालवली.

दलाच्या गस्तीनौका तसेच विमाने आणि हेलिकॉप्टर यात सहभागी झाले होते. लक्षद्वीप-मिनिकॉय बेटांजवळ 18 मार्चला दलाच्या पथकांना तीन संशयास्पद मच्छिमार बोटी दिसल्या. त्यांना अडवल्यावर दलाच्या जवानांनी त्या बोटींवर जाऊन खलाशांकडे चौकशी केली असता त्यांना समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. सखोल चौकशी आणि तपासणी केल्यावर यातील रवीहंसी या श्रीलंकेच्या मच्छिमार बोटीत हेरॉईनचा साठा असल्याचे आढळले. त्याखेरीज खलाशांकडून 5 एके 47 रायफलीही जप्त करण्यात आल्या. या तीनही बोटींवरील 19 खलाशांना पुढील कारवाईसाठी केरळला नेण्यात आले. 

या महिन्यात तटरक्षक दलाने अशा प्रकारची दुसरी मोठी कारवाई केली आहे. यापूर्वी 5 मार्चला दलाने लक्षद्वीप बेटांजवळच श्रीलंकेच्या दुसऱ्या संशयास्पद बोटीवर छापा मारला. तटरक्षक दलाच्या जवानांना पाहताच बोटीवरीच चोरट्यांनी 200 किलो हेरॉईन आणि 60 किलो हशीश भरसमुद्रात फेकून दिल्याचे मान्य केले.  गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येही तटरक्षक दलाने अशाच मोहिमांमध्ये सुमारे एक हजार कोटी रुपये किंमतीचे 120 किलो अंमली पदार्थ जप्त केले होते. वर्षभरात दलाने आतापर्यंत सुमारे 5 हजार कोटी रुपये किंमतीचे दीड टन अंमली पदार्थ जप्त केले आहेत.

---------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Indian Coast Guard seized heroin major operation Lakshadweep Minicoy Island

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

SCROLL FOR NEXT