Rajiv Poddar
Rajiv Poddar sakal media
मुंबई

शेतीत यांत्रिकीकरण वाढल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल - राजीव पोद्दार

कृष्ण जोशी

मुंबई : भारतीय शेतीमध्ये यांत्रिकीकरण (Mechanization in Indian farm) वाढत जाईल तसे शेतकऱ्यांचे उत्पन्न (farmers income increases) वाढेल. त्यामुळे आम्ही कंपनीतील उत्पादनाबरोबरच शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारे आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण (Modern technology education) देतो, अशी माहिती बाळकृष्ण इंडस्ट्रीज (बीकेटी) चे सह व्यवस्थापकीय संचालक राजीव पोद्दार (Rajiv Poddar) यांनी सकाळ ला दिली.

हायवे टायर्स म्हणजे प्रामुख्याने शेतीसाठी, उद्योगांसाठी, खाणकामासाठी लागणाऱ्या यंत्रसामुग्रीचे टायर बनविणारी बीकेटी ही देशातील व जगातील अग्रगण्य कंपनी आहे. छोटे मोठे ट्रॅक्टर, हार्वेस्टर, एक्सकॅव्हेटर, लोडर, आरटीजी क्रेन, फोर्कलिफ्ट, टेलिहँडलर, स्ट्रॅडल कॅरियर, सेनादलाचे ट्रक, विमानतळावरील ट्रॅक्टर, मोबाईल क्रेन, वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेलर, खाणीतल्या वीस-तीस फूट उंच ट्रकचे टायर ही कंपनी तयार करते.

शेतीत सध्या यांत्रिकीकरण सुरू आहे तसेच खाणींचे खासगीकरण होत असल्याने त्यात क्षमतावाढ व आधुनिकीकरण होत आहे. यामुळे तेथे लागणाऱ्या विविध उपकरणांच्या टायरची गरजही वाढते आहे. देशात सुरु असलेली बांधकामे व पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठीही मोठी उपकरणे लागतातच. त्यामुळे त्यांच्या टायरची बाजारपेठही वाढतेच आहे. सध्या आमचा या क्षेत्रातील देशी व परदेशी बाजारपेठेतील वाटा सहा ते सात टक्के असून पाच वर्षांत तो आम्हाला बारा टक्क्यांवर न्यायचा आहे. त्यासाठी आमचे क्षमता वाढीचे प्रयत्न सुरू आहेत, असेही राजीव पोद्दार म्हणाले.

देशातील शेतकऱ्यांनाही विकासाची आस आहे, शेतात वेगाने काम करून उत्पन्न वाढविण्यासाठीही त्याला यंत्रसामुग्रीची गरज आहे. यांत्रिकीकरणानेच भारतातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, त्यासाठी आम्हीही त्यांना आधुनिक तंत्रज्ञान वापरण्याचे वेगवेगळ्या प्रकारे प्रशिक्षण देतो. उपकरणे कशी वापरावीत यासाठी ट्रॅक्टर क्लिनिक आयोजित करतो. यामुळे हळुहळू बदल निश्चित होईल, असा विश्वासही पोद्दार यांनी व्यक्त केला.

आमची उत्पादने जगातील 160 देशांमध्ये निर्यात होतात, तेथील माती-हवामान यांचा अभ्यास करूनच आम्ही टायर बनवतो. त्याचा फायदा आम्हाला भारतातही होतो, काळी माती, लाल माती, वेगवेगळ्या प्रकारची शेतजमीन किंवा विशिष्ठ पिकानुसारही आम्ही वेगवेगळ्या तऱ्हेची टायर बनवतो. त्याचप्रमाणे समाजाचे देणे फेडण्यासाठी आम्ही अनेक अंगानी समाजसेवा करतो. कोविडकाळात देशभर गरजूंना हजारो टन शिधा-तयार जेवण पुरवणे, डॉक्टरांना लाखो पीपीई किट-मास्क देणे अशी कामे आम्ही केली. राजस्थानात मुलींसाठी विनामूल्य शाळा सुरू केली असून रुग्णालयही उघडले आहे. भूज येथेही शालेय विद्यार्थ्यांसाठी कम्युनिटी किचन तयार केले आहे, असेही पोद्दार यांनी नमूद केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Avinash Bhosale: पुण्यातील उद्योजक अविनाश भोसलेंना दिलासा! अखेर जामीन मंजूर

Gujarat News : 'तिला' डॉक्टर व्हायचं होतं, बोर्डाच्या परीक्षेत ९९ टक्के मिळाले; पण दुर्दैव...

EPFO Latest News : PF अकाउंटमधून तीन दिवसात मिळणार एक लाख रुपये, करा फक्त 'हे' काम

Share Market Closing: शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्स 73,917 आणि निफ्टी 22,465 अंकांवर, कोणते शेअर्स वधारले?

Yed Lagla Premach: 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत 'या' अभिनेत्याची एन्ट्री; दिसणार इन्सपेक्टर जय घोरपडेच्या भूमिकेत

SCROLL FOR NEXT