Dy Patil Stadium Google
मुंबई

IPL: डी. वाय. पाटील स्टेडियम मध्ये रंगणार सामने; यजमान शहर म्हणून नवी मुंबई सज्ज

सकाळ वृत्तसेवा

वाशी : २७ मार्च ते १८ मे या कालावधीत नवी मुंबईतील (Navi Mumbai) डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये (Dy Patil stadium) इंडियन प्रीमियर लीग (Indian premier league) अर्थात आयपीएलचे २० सामने खेळविण्यात येणार आहेत. त्‍यानिमित्त जगभरातील नामांकित क्रिकेटपटू व क्रीडा रसिक नवी मुंबईत येणार आहेत. यजमान शहर म्हणून नवी मुंबईचा नावलौकिक व्हावा, यादृष्टीने महापालिका आयुक्त अभिजित बांगर (Abhijit Bangar) यांनी आयपीएलच्या अनुषंगाने करायच्या कामांचे नियोजन करण्यासाठी क्रीडा विभाग व संबंधित विभागांची नुकतीच आढावा बैठक घेतली.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, शहर अभियंता संजय देसाई, क्रीडा विभागाचे उपआयुक्त मनोजकुमार महाले, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, उद्यान विभागाचे उपआयुक्त जयदीप पवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पाटील, परिवहन व्यवस्थापक योगेश कडुसकर, अतिरिक्त शहर अभियंता शिरीष आरदवाड व इतर अधिकारी उपस्थित होते. नवी मुंबईत होणाऱ्या आयपीएलच्या २० सामन्यांपैकी १६ सामने हे प्रकाशझोतात खेळविले जाणार आहेत.

त्या अनुषंगाने प्रामुख्याने वाहन पार्किंग व्यवस्थेकडे पोलिस विभागाच्या सहकार्याने विशेष लक्ष देण्याचे आयुक्तांनी सूचित केले. स्टेडियमच्या एकूण क्षमतेच्या २५ टक्के प्रेक्षकांना प्रत्यक्ष स्टेडियमध्ये बसून सामने पाहता येणार असल्याने किमान ५ हजार गाड्यांच्या पार्किंगचे नियोजन करावे, असे निर्देश आयुक्तांनी दिले. पार्किंगसाठी निश्‍चित केलेल्‍या जागांची माहिती क्रीडा रसिकांना उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विविध माध्यमांतून व्यापक प्रसिद्धी करावी, अशा सूचना देण्यात आल्‍या आहेत.

स्वच्छ व सुंदर शहर हा नवी मुंबईचा नावलौकिक असून नुकत्याच झालेल्या आशियाई महिला फुटबॉल चषक आंतरराष्ट्रीय स्पर्धेनंतर लगेचच आयपीएलचे सामने नवी मुंबईत होत आहे. हा या शहरासाठी सन्मान आहे. त्यामुळे क्रिकेटसारख्या सर्वाधिक लोकप्रिय खेळ बघण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन जागतिक कीर्तीचे खेळाडू व क्रीडा रसिकांचे स्वागत करताना त्यांच्या नजरेत शहराची प्रतिमा उंचावेल, अशाप्रकारे नियोजन करण्याकडे काटेकोर लक्ष द्यावे.
- अभिजित बांगर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नीट पेपरलीक प्रकरणाची चार्जशीटही लीक, साक्षीदारांची नावं बाहेर, कोर्टानं सुनावलं...

IPL 2027: हार्दिक पांड्या परत आला तर चालेल का? गुजरात टायटन्सची कर्णधार शुभमन गिलसोबत चर्चा अन् मग...

Jantar Mantar Season 2: जंतर-मंतरचा ‘सीजन-२’ लवकरच! अभिजीत दिपकेंची मोठी घोषणा; यावेळी काय असणार? सौरव दासांनी सांगितला प्लॅन

मध्य प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; ५२७ पूरग्रस्तांचे रेस्क्यू, मुख्यमंत्र्यांकडून २४ तास मॉनिटरिंग

वसू आत्याची खेळी यशस्वी होणार! नंदिनीच्या खोट्या गरोदरपणाचं सत्य सगळ्यांसमोर येणार; 'लग्नानंतर होईलच प्रेम'मध्ये मोठा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT