मुंबई

नवी मुंबईत निकृष्ट पीपीई किट पुरवठादार काळ्या यादीत 

सुजित गायकवाड

नवी मुंबई : कोरोना उपचार करणाऱ्या डॉक्‍टर, परिचारिका, वैद्यकीय अधिकारी आणि रुग्णांना पुरवण्यात येत असलेल्या वैद्यकीय साहित्यांच्या दर्जाबाबत महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे. काही दिवसांपूर्वी निकृष्ट दर्जाचे हातमोजे पुरवठा केल्याप्रकरणी एस्के सर्जीकल या कंत्राटदार कंपनीला महापालिकेने काळ्या यादीत टाकले होते. त्यानंतर आता निकृष्ट दर्जाचे पीपीई किट पुरवठा करणाऱ्या "सुपर प्लास्टिक' या कंत्राटदार कंपनीलाही काळ्या यादीत टाकले आहे. दर्जाबाबत तडजोड करणाऱ्या अशा तीन कंपन्यांना एक महिन्यात काळ्या यादीत टाकले आहे. त्यामुळे कंत्राटदारांचे धाबे दणाणले आहेत. 

नवी मुंबईत कोरोनाची साथ मोठ्या प्रमाणात पसरली होती. या वेळी महापालिका प्रशासनातर्फे शर्थीचे प्रयत्न सुरू केले. यासाठी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसह इतर विभागातील अधिकाऱ्यांनीही युद्धपातळीवर काम केले आहे. विशेष म्हणजे रुग्णांसाठी आवश्‍यक कोणतीही आवश्‍यक खरेदीत महापालिकेने हात आखडता घेतला नाही. त्यासाठी बाजारभावानुसार चांगल्या किमतीच्या वस्तू आणि साहित्य खरेदीवर भर देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत आवश्‍यक वैद्यकीय साहित्यांचा पुरवठा बंद होऊ नये म्हणून कंत्राटदारांची बिले देखील वेळच्या वेळेवर अदा होत आहेत. त्यानंतरही निकृष्ट दर्जाचे साहित्य पुरवून रुग्णांच्या जीवाशी खेळ करण्याबरोबर महापालिकेची फसवणूक खपवून घेतली जाणार नाही, असा संदेश आयुक्त अभिजीत बांगर हे देत आहेत. त्यानुसार त्यांनी "एस्के सर्जीकल'ने महापालिकेला पुरवलेले हातमोजे खराब दर्जाचे निघाल्यानंतर सर्वच वैद्यकीय उपकरणे, वस्तू आणि साहित्यांचा दर्जा काटेकोरपणे तपासला जात आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांना अधिकार दिले आहेत. तसेच थेट कारवाई करण्याचे आदेशही दिले आहेत. आता निकृष्ट दर्जाचे पीपीई किट पुरवठा करणाऱ्या "सुपर प्लास्टिक' या कंत्राटदार कंपनीलाही काळ्या यादीत टाकले आहे. 

काय आहे प्रकरण 
कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी नवी मुंबई महापालिकेला दररोज हजारो पीपीई किटची आवश्‍यकता असते. ते खरेदीसाठी महापालिकेतर्फे निविदा काढण्यात आल्या होत्या. या दरम्यान बाजारभावापेक्षा कमी दरात पीपीई किट देण्यास तयार असल्याने सुपर प्लास्टिक या कंपनीला 1 लाख 20 हजार पीपीई किट देण्याचे कंत्राट देण्यात आले. त्यापैकी सुरुवातीला दिलेल्या सुमारे 70 हजार किटपैकी काही किटवर डाग आणि महिलांचे केस असल्याचे आढळून आले. ही बाब आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निदर्शनास येताच त्यांनी संबंधित कंपनीला कारणे द्या नोटीस बजावून काळ्या यादीत टाकले आहे. या कंपनीआधी निकृष्ट दर्जाचे हातमोजे पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई केल्यानंतर त्याचे उत्पादन करणाऱ्या कंपनीलाही काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. 

महापालिकेचे डॉक्‍टर, रुग्ण आणि वैद्यकीय सुविधा देणारे अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत कसलीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही. दर्जानुसार महापालिका पैसे अदा करीत असेल तर मग खराब दर्जाचे साहित्य का स्वीकारायचे, असा प्रश्‍न आहे. त्यामुळे अशा कंत्राटदारांवर कठोर कारवाई केली जाईल. 
- अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका. 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर तोडगा निघाला! बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे; महायुती सरकारने मान्य केल्या प्रमुख मागण्या, वेतनवाढ आणि ग्रॅच्युइटीवर निर्णय

T20 WC, IND W vs SA W: भारताचे सेमीफायनलचे गणित मारिझान कापच्या 'वन वुमन शो'मुळे बिघडले! दक्षिण आफ्रिकने मँचेस्टरमध्ये दिली मात

Khadakwasla Rain Update: खडकवासला धरण परिसरात तासाभरात ३० मिमी पाऊस; पाणीसाठ्यात वाढ नाही, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी

Sangli Crime Twist: वेदांत बंडगर खून प्रकरणाला नवे वळण; कुख्यात गुंड म्हमद्या नदाफ अटकेत, पोलिस कोठडीचे अधिकार राखून कारागृहात रवानगी

Paithan Road Crash : पैठण तालुक्यात भीषण अपघात; भरधाव पिकअपच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, दोन बालकांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT