मुंबई

मान्सूनविषयीच्या 'या' १० भन्नाट गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? नक्की वाचा...

अथर्व महांकाळ

मुंबई: भारतात मान्सून येणार अशी बातमी कानावर पडली की देशातला प्रत्येक व्यक्ती सुखावतो. त्याच कारणही तसंच आहे. उन्हाळ्याच्या प्रचंड उकाड्यातून सुटका होण्यासाठी मान्सून देवानं पाठवलेल्या देवदूताचं काम करतो. मात्र हा मान्सून नेमका येतो कुठून? मान्सून आल्यावर काय बदल घडतात? मान्सून म्हणजे नेमकं काय? हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

या आहेत मान्सूनबद्दल काही महत्वाच्या गोष्टी: 

(१) मान्सून म्हणजे काय?

'मान्सून' या शब्दाचा अर्थ पाऊस असा होत नाही. खरंतर मान्सून हा शब्द अरबी भाषेतल्या 'मौसीम' या शब्दापासून तयार झाला आहे. अरबी भाषेत मौसीम म्हणजे हवेत होणारे बदल. तसंच मान्सून म्हणजे थंड प्रदेशातून उष्ण प्रदेशाकडे प्रचंड वेगानं वाहणारे वारे. 

(२)  कसा तयार होतो मान्सून?

उन्हाळ्यात मध्य आणि उत्तर भारतात अति उष्णता निर्माण होते. या उष्णतेमुळे हिंदी महासागरावर निर्माण झालेले वारे या उष्ण  प्रदेशांकडे वाहू लागतात. मात्र हे वारे प्रवासादरम्यान ढग ओढून आणतात. हे ढग हिंदी महासागरातून बाष्पीभवन होत असलेलं पाणी शोषून घेतात. जेव्हा हे ढग भारताच्या दक्षिण भागात येतात तेव्हा पर्वतरांगांना येऊन धडकतात. त्यामुळे पावसाला सुरुवात होते. यालाच आपण मान्सून म्हणतो. 

(३) वीज पडल्यामुळे किती मृत्यू ?

भारतात मान्सूनदरम्यान तब्बल ५ लाखांपेक्षा जास्त वेळा वीज कडाडते. यामुळे प्रत्येक वर्षी तब्बल १७५५ पेक्षा जास्त लोकं मृत्युमुखी पडतात. 

(४) हवामानाचा अंदाज:

भारतात पहिल्यांदा पावसासंबंधीचा हवामान अंदाज ४ जून १८८६ ला तयार करण्यात आला होता. १८७१ पासून २०१९ पर्यंत तब्बल ९९ वर्ष भारतात सरासरी एवढा पाऊस आला आहे. तर २६ वर्ष दुष्काळाची आहेत.  

(५) मान्सून शब्दाचा वापर:

हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागरावरून वाहणारे हंगामी वारे म्हणजे मान्सून. अखंड भारतात 'मान्सून' हा शब्द पहिल्यांदा ब्रिटिशांच्या काळात इंग्रजीमधून वापरण्यात आला होता.  

(६) खरा अर्थमंत्री: 

मान्सूनवर भारतातल्या तब्बल ७० कोटी  शेतकऱ्यांचं जीवन अवलंबून आहे. भारताचा जीडीपी उंचावण्यात या शेतकऱ्यांचा तब्बल १६ - १७ टक्के वाटा असतो. त्यामुळे मान्सूनला काही अर्थतज्ञ 'खरा अर्थमंत्री' असंही संबोधतात. 

(७) भारतात मान्सूनचे दोन भाग:

भारतात मान्सून दोन भागांमधून येतो. एक म्हणजे बंगालच्या उपसागरातून तर एक अरबी समुद्रातून. हे दोन्ही मान्सून वारे संपूर्ण भारतात पसरतात. त्यानंतर राजस्थानच्या अतिउष्ण वातावरणामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो आणि तिथूनही वारे वाहू लागतात. 

(८) सट्टाबाजारही जोमात:

मान्सूनचा अंदाज लावण्यात सट्टाबाजारही जोमात असतो. दरवर्षी भारतात मान्सूनचा अंदाज मांडण्यासाठी तब्बल २५ हजार कोटींचा सट्टा लागतो. 

(९) बेडकाच्या पाठीवर उंदीर:

मान्सून काळात आपल्याला बहुतांश वेळी पाण्यात असणाऱ्या बेडकाच्या पाठीवर उंदीर दिसून येतात. पावसाच्या पाण्यात वाहून जाऊ नये म्हणून उंदीर बेडकांच्या पाठीवर बसतात. 

(१०) नाटकीय बदल: 

भारतातील मान्सूनमध्ये दरवर्षी नाटकीय पद्धतीनं बदल होत असतात. यात अतिसूक्ष्म बदल सुद्धा पूर किंवा ढगफुटीसारखं  भयावह रूप धारण करू शकतात.

10 facts about monsoon that u really do not know

 
    

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi in Dharashiv: अमेरिकेत व्हाईट हाऊसमध्ये जेवणाच्या टेबलवर होतं 'सूपरफूड'; मोदींनी सांगितला किस्सा

T20 WC 24 South Africa Squad : दक्षिण आफ्रिकेने टी-20 वर्ल्ड कपसाठी संघाची केली घोषणा! 2 अनकॅप्ड खेळाडूंची ताफ्यात एन्ट्री

Indian Navy: "कोणत्याही आव्हानासाठी नौदल कायम सज्ज," पदभार स्वीकारताच नवे नौदल प्रमुख गरजले

Latest Marathi News Live Update : काँग्रेस जनतेची संपत्ती, त्यांच्या व्होटबँकेला वाटणार, मोदींचा आरोप

Swapnil Joshi: स्वप्नील जोशीच्या मुलांचा 'नाच गं घुमावर' भन्नाट डान्स; पहा व्हिडीओ

SCROLL FOR NEXT