मुंबई

वुहानच्या धर्तीवर आता मुंबईतही 'प्री इंजिनिअर्ड' रुग्णालय बांधणार ! हे कसले संकेत ?

सकाळवृत्तसेवा

मुंबई, ता 20 - कस्तुरबा रुग्णालय परिसरात नवी तीन मजली इमारत उभारण्यात येणार आहे. प्री इंजिनिअरिंग बिल्डींग या अत्याधुनिक पद्धतीने या नव्या रुग्णालयाची उभारणी करण्यात येणार आहे, असे समजते. मुंबईतील कोरोना रुग्णांवरील उपचारात कस्तुरबा रुग्णालय महत्त्वाचे आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचे उगमस्थान समजल्या जात असलेल्या वुहानमध्ये दोन रुग्णालये तातडीने उभारण्यात आली होती. त्यामुळे कस्तुरबा परिसरातील तीन मजली नवी बिल्डींगही प्री इंजिनिअर्ड असेल. यात बिल्डींग उभारणीतील अनेक भाग कारखान्यात तयार होतात आणि त्याची जुळणी केवळ जागेवर करण्यता येते. त्यामुळे ही ग्राऊंड आणि दोन मजले असलेली बिल्डींग तीन महिन्यात पूर्ण होईल अशी अपेक्षा असल्याचे समजते.

वुहानमध्ये कोरोनासाठी उभारलेली खास रुग्णालये अवघ्या दहा दिवसात उभारण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. यातील दोन रुग्णालयाची क्षमता एक हजार बेडची होती. त्याशिवाय विलगीकरणासाठीही 14 तात्पुरती आरोग्य केंद्र तयार करण्यात आली होती. 

कस्तुरबा रुग्णालयात विलगीकरणासाठी साठ बेडस् आहेत. कस्तुरबा रुग्णालय परिसरात नवी इमारत उभारण्याबाबत येत्या काही दिवसात निर्णय अपेक्षित आहे. त्यावेळी इमारतीचा आराखडा निश्चित होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर इमारत उभारणीचे काम एक मेपासून सुरु होईल असाही अंदाज आहे. या सर्व कामास मंजूरी मिळाल्यास मुंबई महापालिका प्रथमच रुग्णालय उभारणीसाठी प्री इंजिनिअर्ड पद्धतीचा अवलंब करेल. त्याची उभारणी करताना त्याचा पाया पारंपारीक पद्धतीनेच बांधण्यात येईल, त्यानंतर मात्र अन्य बांधकाम फॅक्टरीत होईल. ते प्रत्यक्ष जागी वसवण्यता येईल. ही इमारत प्रामुख्याने स्टेनलेस स्टीलची असेल. प्रामुख्याने ही प्री इंजिनिअर्ड पद्धत मेट्रो स्थानक, वेअरहाऊसच्या बांधकामासाठी वापरली जाते. 

वुहानमध्ये या प्रकारची इमारत आता उपयोगात नसली तरी मुंबई महापालिका भविष्यातही या इमारतीचा उपयोग विलगीकरणासाठी करणार आहे. या नव्या इमारतीत 47 बेडस् वॉर्डमध्ये असतील. त्याशिवाय अतिदक्षता विभागात सहा आणि अन्य सात बेडस् असतील. मुंबई महापालिकेने या इमारतीच्या उभारणीसाठी निविदा मागवल्या आहेत, इमारतीचा अंतिम आराखडा आयआयटी तसेच मुंबई महापालिकेतील आधिकारी निश्चित करतील.

inspired by china BMC to build pre engineered hospital in kasturba premises

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Update: पहाटेपासूनच मुंबईत पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात; रस्त्यांना तलावाचे स्वरूप, पाच दुर्घटनांनी वाढवली चिंता!

'धुरंधर'नंतर रणवीरची नवी खेळी! यावेळी शत्रू माणसं नाहीत, तर..., 300 कोटींच्या सिनेमाची जोरदार चर्चा

Ayodhya Temple Theft : अयोध्या मंदिर दानचोरी! महाकुंभ काळात सर्वाधिक अपहार, मेहुण्यांनी लाटले कोट्यवधी; मालमत्ता खरेदी

Gold Bra Viral Photo : असावा एखादा छंद! महिला खासदाराच्या घरात ५ कोटी कॅश, २७ किलो सोन्याचे ब्रा, अंडरवियर सापडले?; पोलिसांनी धाड टाकली अन्

Pune Crime : ‘एपीआय’ला मारहाण केल्याप्रकरणी पोलिस हवालदार निलंबित

SCROLL FOR NEXT